पश्चिम रेल्वेकडून (Western Railway) नेहमीच पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात येत असतात. यातील एक भाग म्हणजे वांद्रे रेल्वे स्थानकाच्या बाहेर प्रवाशांना आणि पर्यटकांसाठी खाद्यपदार्थांची चव घेण्यासाठी एक वेगळा रेस्टॉरंट सुरू करण्यात येणार आहे. ज्यामध्ये प्रवाशांना आणि पर्यटकांना रेल्वेच्या डब्यात बसूनच खादयपदार्थांची चव चाखता येईल. रेल्वेच्या जुन्या डब्याचा वापर करून लवकरच रेस्टॉरंट ऑन व्हील्स (Restaurant on Wheels Bandra Railway Station), तसेच इतर सुविधांचा विकास करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध होतील असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (Bandra Station)
वांद्रे स्थानकालगत (Bandra Station) पश्चिमेला लोहमार्ग पोलिस ठाण्याजवळची मोठी भिंत पडल्याने त्याठिकाणी ३५०० चौरस मीटरची जागा उपलब्ध झाली आहे. या जागेचा विकास करण्यात येणार असून, त्याठिकाणी रेस्टॉरंट ऑन व्हील, तसेच इतर सुविधा विकसित करण्यात येणार आहे. वांद्रे स्थानकाच्या ऐतिहासिक (Historical Bandra Railway Station) जिर्णोद्धारानंतर स्थानक लागताच आणखी काही भाग मोकळा करण्यात आला आहे. अनावश्यक स्टॉल्सची जागा बदलणे, बॅरिकेड्स स्थलांतरित करणे, ऑटो आणि इतर वाहनांना स्थानकाजवळ येण्यापासून रोखने अशा उपाय योजना करण्यात आल्या आहेत. यामुळे पादचारी आणि प्रवाशांना मुक्तसंचारासाठी अधिक क्षेत्र तयार झाले आहे.
(हेही वाचा – वायनाडमध्ये Rahul Gandhi आणि Priyanka Vadra यांच्या विजयामागे मुसलमानांचा पाठिंबा; माकपने केली पोलखोल)
तसेच प्रवाशांना आणखी सोयी उपलब्ध करून देण्यासाठी पश्चिम रेल्वे मोकळ्या जागा निर्माण करत असून, नवीन सुविधांची निर्मिती करण्यासाठी स्थानक परिसराचा विकास करत असल्याचे पश्चिम रेल्वे हे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले.तसेच वांद्रे पश्चिमेसोबतच पूर्वेला जाणाऱ्या प्रवाशांसाठी वांद्रे टर्मिनसला उपनगरीय स्थानकाशी जोडण्यासाठी २४ कोटी रुपयांचा ३४० मीटर लांबीचा स्कायवॉक प्रस्तावित केला आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community