-
ऋजुता लुकतुके
भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्याच्या १४ वर्षांच्या कारकीर्दीची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घेतली आहे. मोदींनी अश्विनला कृतज्जतापूर्वक पत्र लिहून भारतीय क्रिकेटला कायम त्याची आठवण राहील आणि ९९ क्रमांकाची जर्सी आता परत दिसणार नाही याचा खेद व्यक्त केला. बोर्डर – गावसकर मालिकेतील ॲडलेड कसोटी ही अश्विनची शेवटची कसोटी ठरली. यात त्याने ५३ धावांत १ बळी घेतला. आणि २९ धावाही केल्या. पुढच्या ब्रिस्बेन कसोटीनंतर त्याने तडकाफडकी आपला निवृत्तीचा निर्णय जाहीर करून टाकला. आपल्या कारकीर्दीत अश्विनने ‘कॅरम बॉल’ हा चेंडू खुबीने टाकला. (Ashwin Retires)
(हेही वाचा- Bandra Station: पर्यटकांसाठी खुशखबर; वांद्रे स्थानकात ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ उभारणार)
मोदींनी त्याच्या निवृत्तीची तुलना कॅरम बॉलशी केली आहे. पत्रात ते म्हणतात, ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्त होण्याचा तुझा निर्णय सगळ्यांना आश्चर्यचकित करून गेला. लोक तुझ्याकडून ऑफ-ब्रेक चेंडूंची अपेक्षा करत असताना, तू कॅरमबॉल टाकून सगळ्यांना त्रिफळाचीत केलंस.’ (Ashwin Retires)
A letter from Prime Minister Narendra Modi to Ravichandran Ashwin 🇮🇳
– Ash, An all time Great of India…!!!! pic.twitter.com/JJvS3nQK1B
— Johns. (@CricCrazyJohns) December 22, 2024
‘कृपया तुझ्या संस्मरणीय कारकीर्दीसाठी माझ्या शुभेच्छांचा स्वीकार कर. गुणवत्तेला मेहनतीची जोड आणि सगळ्यात आधी संघहिताचा विचार करण्याचा तुझा स्वभाव यामुळे तू भारतासाठी कायम महत्त्वाचा खेळाडू राहिलास,’ असं पुढे पंतप्रधानांनी अश्विनला म्हटलं आहे. पंतप्रधानांनी अश्विनच्या नियमित बळी टिपण्याच्या कौशल्याचंही कौतुक केलं आहे. ‘तू मैदानावर असताना चाहत्यांना तू फलंदाजाला बाद करणारच याची खात्री असायची. तुझ्याकडून अपेक्षा ठेवता येते, अशी लोकांची भावना होती. आणि आता त्यांना तुझी उणीव जाणवेल. तू फलंदाजांभोवती फिरकीचं जाळं विणून त्यांना कधीही बाद करू शकत होतास. तुझी पोकळी आता मैदानावर जाणवेल,’ असं मोदी यांनी अश्विनला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. (Ashwin Retires)
(हेही वाचा- Mumbai BKC : बीकेसीतील ‘मीसिंग लिंक’ वाहतुकीसाठी खुला; वाहतूक कोंडीतून वाहनांना दिलासा)
अश्विनने २०१० साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आणि भारताकडून तो १०६ कसोटी, ११६ एकदिवसीय आणि ६५ टी-२० सामने खेळला. यात त्याने ७६५ आंतरराष्ट्रीय बळी मिळवले. तर कसोटींत ७ शतकांसह त्याने ३,००० च्या वर धावाही केल्या. निवृत्त होतानाही तो आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल अष्टपैलू खेळाडू होता. (Ashwin Retires)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community