श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष यांना मुंबई दौरा दरम्यान जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, ही धमकी पाकिस्तानच्या नंबर वरून आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी विलेपार्ले पोलीस ठाण्यात अज्ञात कॉलर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे २१ ते २३ डिसेंबर दरम्यान निघालेल्या श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती जनजागरण अभियान यात्रेला लक्ष्य करून बॉम्बने उडविण्याचा धमक्या देण्यात आलेल्या असल्याचे समजते. (Shri Krishna Janmabhoomi)
उत्तर प्रदेशातील मथुरा येथील रहिवासी आणि श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष आशुतोष पांडे (४८) यांनी विलेपार्ले पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते चुलत भाऊ प्रदिपकुमार भार्गव याच्यासोबत मुंबईसाठी विमान पकडण्यासाठी दिल्ली विमानतळावर आले होते,त्यावेळी त्यांना पहाटे ४.५२ वाजता पाकिस्तानी नंबरवरून व्हॉट्सॲप आला, कॉल करणाऱ्याने यात्रा रद्द करण्याची मागणी केली आणि मागणी पूर्ण न झाल्यास यात्रेत बॉम्ब ठेवण्याची धमकी दिली. त्यानंतर पांडे हे मुंबईत आल्यानंतर, दुपारी अडीज वाजता त्यांना पुन्हा अज्ञात कॉलरने त्याच्याशी व्हॉट्सॲपद्वारे पुन्हा संपर्क साधला आणि धमक्या दिल्या, असे पांडेने पोलिसांना सांगितले. (Shri Krishna Janmabhoomi)
पांडे यांच्या तक्रारीत मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह मशीद कायदेशीर वादात प्राथमिक वादी म्हणून त्यांची भूमिका आहे, जिथे त्यांनी अलाहाबाद न्यायालयात वैयक्तिकरित्या युक्तिवाद केला. त्यांनी विलेपार्ले पोलिसांना सांगितले की, त्याला जानेवारी पासून पाकिस्तानकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, ज्याची त्याने संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे. (Shri Krishna Janmabhoomi)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community