Champions Trophy 2025 : भारताचे चॅम्पियन्स करंडकातील सामने युएईलाच होणार

Champions Trophy 2025 : भारतीय सामन्यांसाठी तटस्थ ठिकाण म्हणून पाकने युएईची निवड केली आहे 

33
Champions Trophy 2025 : भारताचे चॅम्पियन्स करंडकातील सामने युएईलाच होणार
Champions Trophy 2025 : भारताचे चॅम्पियन्स करंडकातील सामने युएईलाच होणार
  • ऋजुता लुकतुके

पुढील वर्षी होणारी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा हायब्रीड पद्धतीने होणार हे आता निश्चित झालं आहे. यातील भारताचे सामने संयुक्त अरब अमिरातील भरवण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतल्याचं समजतंय. तसं पाकिस्तानने आयसीसीला कळवलं आहे. त्यामुळे आता स्पर्धेचं नवीन वेळापत्रक याच आठवड्यात जाहीर होऊ शकतं. ‘हायब्रीड मॉडेलप्रमाणे, स्पर्धेचं तटस्थ ठिकाण म्हणून पाकिस्तानने दुबईची निवड केली आहे. तसं त्यांनी आयसीसीला कळवलंही आहे. त्यामुळे भारताचे सर्व सामने हे दुबईत होतील,’ असं पाक बोर्डातील सूत्रांनी एएफपी वृतसंस्थेला सांगितलं आहे. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा- Shri Krishna Janmabhoomi मुक्ती ट्रस्टच्या अध्यक्षांना पाकिस्तानमधून धमकी)

संयुक्त अरब अमिरातीत दुबई, आबूधाबी आणि शारजा अशी तीन आंतरराष्ट्रीय मैदानं आहेत. पाक बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नकवी तसंच युएईचे क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शेख मुबारक अल नयान यांची गेल्याच आठवड्यात एक बैठक झाली आहे. आणि तिथे स्पर्धेच्या कार्यक्रमाची, वेळापत्रकाची चर्चाही झाल्याचं समजतंय. भारतीय संघ बाद फेरीत पोहोचला तर त्या स्पर्धाही युएईमध्येच होतील. भारत विरुद्‌ध पाकिस्तान हा सगळ्यात लक्षवेधी सामना आधीच्या वेळापत्रकानुसार, २३ फेब्रुवारीला होऊ शकतो. (Champions Trophy 2025)

गेलं वर्षभर चॅम्पियन्स करंडकाविषयीची अनिश्चितता कायम होती. अखेर १९ डिसेंबरला आयसीसीने त्यावर तोडगा काढताना आगामी आयसीसी कार्यक्रमपत्रिकेत २०२७ पर्यंत भारत किंवा पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आयसीसी स्पर्धांमध्ये दोन्ही देश तटस्थ ठिकाणीच खेळतील असा निर्वाळा दिला. आणि त्यानंतर ही कोंडी फुटली आहे. पाकिस्तान बोर्ड, बीसीसीआय तसंच आयसीसी यांची एकवाक्यता झाल्यानंतर आता चॅम्पियन्स करंडकाचा प्रश्न मार्गी लागला आहे. १९ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. २०२३ त्या एकदिवसीय विश्वचषकात अव्वल ठरलेले पहिले ८ संघ यात सहभागी होणार आहेत. (Champions Trophy 2025)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.