Boxing Day Test : बॉक्सिंग डे कसोटी म्हणजे काय; भारताची या कसोटीतील कामगिरी कशी आहे?

Boxing Day Test : बोर्डर - गावसकर मालिकेत २६ तारखेला बॉक्सिंग डे कसोटी खेळवली जाणार आहे 

52
Boxing Day Test : बॉक्सिंग डे कसोटी म्हणजे काय; भारताची या कसोटीतील कामगिरी कशी आहे?
Boxing Day Test : बॉक्सिंग डे कसोटी म्हणजे काय; भारताची या कसोटीतील कामगिरी कशी आहे?
  • ऋजुता लुकतुके

सध्या सुरू असलेल्या बोर्डर – गावसकर मालिकेतील चौथी कसोटी येत्या २६ डिसेंबरपासून मेलबर्न इथं खेळवली जाणार आहे. मालिकेत १ – १ अशी बरोबरी आहे. आणि दोन्ही संघ एकसारख्या समस्यांशी झुंजत असताना मालिकेतील हा महत्त्वाचा आणि निर्णायक टप्पा आहे. दोन्ही संघांची फलंदाजीतील कामगिरी अनियमित झाली आहे. ऑस्ट्रेलियन संघाची आघाडीची फळी चमकलेली नाही तर भारताची मधली फळी चाचपडत खेळत आहे. आणि याचा फटका दोन्ही संघांना मालिकेत बसला आहे. अशावेळी बरोबरीची कोंडी फुटू शकते ती ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट मैदानावर बॉक्सिंग डे कसोटीत. (Boxing Day Test)

(हेही वाचा- Champions Trophy 2025 : भारताचे चॅम्पियन्स करंडकातील सामने युएईलाच होणार)

बॉक्सिंग डे कसोटीला ऑस्ट्रेलियात पारंपरिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. नाताळ सणाच्या एक दिवस नंतर २६ डिसेंबरला ब्रिटिश राष्ट्रकूल देशांमध्ये बॉक्सिंग डे साजरा होतो. वर्षभर जनतेसाठी कामं करणाऱ्या आणि विविध सरकारी, खाजगी सेवा बजावणाऱ्या लोकांप्रती कृतज्जता म्हणून त्यांना सुटी दिली जाते. आणि सरकारी सुटीचा हा दिवस बॉक्सिंग डे म्हणून साजरा होतो. ऑस्ट्रेलियात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड या ऐतिहासिक क्रिकेट मैदानावर या दिवशी आंतरराष्ट्रीय कसोटी सामना भरवण्यात येतो. आणि त्याला म्हणतात बॉक्सिंग डे कसोटी. ऑस्ट्रेलियन संघ मायदेशात मालिका खेळणार असेल तर या दिवशी मेलबर्नमध्ये कसोटी सामना भरवणं ही परंपरा आहे. (Boxing Day Test)

सुटीचा दिवस असल्यामुळे या दिवशी ऑस्ट्रेलियातील सगळ्यात मोठ्या मैदानातही (१,२०,००० आसन क्षमता) हाऊस फुल्ल गर्दी होते. आणि गेल्या काही वर्षांमध्ये या कसोटीमध्ये खणखणीत कामगिरीही पाहायाला मिळाली आहे. ॲशेल मालिका असो किंवा बोर्डर – गावसकर मालिका, काही संस्मरणीय सामने आणि चुरस बॉक्सिंग डे कसोटीत पाहायला मिळाली आहे. आणि त्यामुळे या कसोटीची लोकप्रियता वाढली आहे. (Boxing Day Test)

(हेही वाचा- Fake companies: देशात २.३३ लाख बनावट कंपन्या; सरकारच्या कारवाईतून आकडेवारी समोर)

यापूर्वीही भारतीय संघ ऑस्ट्रेलियात बॉक्सिंग डे कसोटी खेळलेला आहे. आणि यात संघाला संमिश्र यश मिळालं आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात १४ बॉक्सिंग डे कसोटी खेळला आहे. आणि यात ४ कसोटींत भारताने विजय मिळवला असला तरी ८ गमावल्या आहेत. आणि २ अनिर्णित राहिल्या आहेत. (Boxing Day Test)

२०२० च्या बोर्डर गावसकर मालिकेत बदली कर्णधार अजिंक्य राहणेचं शतक आणि त्यानंतर भारतीय संघाने मिळवलेला यादगार विजय ही भारताची बॉक्सिंग डे कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. अजिंक्यने कसोटीच्या पहिल्या डावात ११२ धावा केल्या होत्या. महत्त्वाचं म्हणजे आधीच्या ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघ ३६ धावांत सर्वबाद झाला असताना अजिंक्यने संघाचं मनोबळ उंचावत संघाला विजय मिळवून दिला होता. आणि त्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियात ही मालिकाही जिंकली होती. (Boxing Day Test)

(हेही वाचा- Shri Krishna Janmabhoomi मुक्ती ट्रस्टच्या अध्यक्षांना पाकिस्तानमधून धमकी)

आता ही कसोटी मालिकेत निर्णायक ठरू शकते. मालिकेत १-१ अशी बरोबरी आहे. आणि आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने उर्वरित दोन कसोटी महत्त्वाच्या ठरणार आहेत. (Boxing Day Test)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.