Anarkali Elephant: राणीच्या बागेत आता हत्तीचे दर्शन नाही

65

मुंबईतील भायखळा येथील सर्वात प्रसिद्ध असलेल्या जिजामाता उद्यान (Jijamata Park) अर्थात राणीच्या बागेतून प्राणीप्रेमीसाठी एक दु:खद बातमी समोर आली आहे. राणीच्या बागेतील शेवटच्या हत्तीणीचा अलिकडेच मृत्यू झाला. अनारकली (Anarkali Elephant) असे या ५९ वर्षीय हत्तीणीचे नाव होते. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने २०१६ मध्ये घेतला निर्णयामुळे देशातील कोणत्याही प्राणीसंग्रहालयात हत्ती ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे राणीच्या बागेतील हत्तींचा अधिवास आता पोरका झाला आहे. (Anarkali Elephant)

(हेही वाचा –Shri Krishna Janmabhoomi मुक्ती ट्रस्टच्या अध्यक्षांना पाकिस्तानमधून धमकी )

अनारकली ही राणीच्या बागेतील सर्वात वयोवृद्ध प्राणी होती. तसेच जिजामाता उद्यानात अनारकली हत्तीण गेल्या महिन्यात एक दिवस संध्याकाळी अचानक जमिनीवर बसली, त्यानंतर तिला उठताच आले नाही. १९७७मध्ये अनारकली व लक्ष्मी (Lakshmi elephant) या दोन्ही हत्तीणी येथे आल्या होत्या. काही वर्षांपूर्वी त्यांच्या जोडीला एक नर हत्ती आणला  होता. मात्र नंतर त्याला केरळला परत पाठवण्यात आले होते. या दोघींपैकी लक्ष्मीचा चार वर्षांपूर्वी संधिवाताने मृत्यू झाला. तेव्हापासून अनारकली एकटीच राहत होती.

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : भारताचे चॅम्पियन्स करंडकातील सामने युएईलाच होणार)

दीडशे किलोचा ट्युमर

अनारकलीला दफन करण्यापूर्वी तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते. त्यामध्ये तिच्या शरीरात तब्बल दीडशे किलोचा ट्युमर असल्याचे आढळून आले होते. मात्र ती जिवंत असताना त्याची कोणतीही लक्षणे दिसली नव्हती. मोठ्या प्राण्यांमध्ये याप्रकारची चाचणी करणे अवघड असते, असे जिजामाता उद्यानाचे संचालक संजय त्रिपाठी यांनी सांगितले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.