Boxing Day Test : कशी आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांची मेलबर्नमधील कामगिरी?

Boxing Day Test : ऑस्ट्रेलियाने २०२० पासून इथं एकही कसोटी हरलेली नाही

31
Boxing Day Test : कशी आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांची मेलबर्नमधील कामगिरी?
Boxing Day Test : कशी आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांची मेलबर्नमधील कामगिरी?
  • ऋजुता लुकतुके

येत्या २६ डिसेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ बॉक्सिंग डे कसोटीत एकमेकांना भिडतील. बोर्डर गावसकर मालिकेच्या दृष्टीने ही कसोटी महत्त्वाची आहेच. शिवाय या ऐतिहासिक मैदानावर दोन्ही संघांची अलीकडची कामगिरी पाहता या कसोटीला आणखी महत्त्वा प्राप्त झालं आहे. कारण, यापूर्वी या मैदानावर खेळलेल्या दोनही कसोटी भारताने जिंकल्या आहेत. तर त्यानंतर पुढील ३ वर्षांत ऑस्ट्रेलियानेही इथं कसोटी गमावलेली नाही. त्यामुळे बॉक्सिंग डे कसोटी खऱ्या अर्थाने वर्चस्वाची लढाई असणार आहे. (Boxing Day Test)

(हेही वाचा- Uttar Pradesh मध्ये 3 खलिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान)

भारतीय संघासाठी मनाची उभारी देणारी गोष्ट म्हणजे २०१४ पासून भारतीय संघ इथं ४ बॉक्सिंग डे कसोटी खेळला आहे. आणि यात दोन संघाने जिंकल्या आहेत. तर १ अनिर्णित राखली आहे. उर्वरित १ गमावली आहे. २०२० मध्ये भारतीय संघ इथे शेवटची कसोटी खेळला आहे. २०१४ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली इथं झालेली कसोटी अनिर्णित राहिली. त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली २०१८ मध्ये भारताने १३७ धावांनी विजय मिळवला. आणि विशेष म्हणजे भारतीय संघाने त्यावर्षी ऑस्ट्रेलियन भूमीवर मालिकाही जिंकली होती. (Boxing Day Test)

२०२० मध्ये मालिकेतील पहिल्या कसोटीनंतर विराटने पितृत्वाची रजा घेतली होती. आणि त्याच्या अनुपस्थितीत बदली कर्णधार अजिंक्य रहाणेनं भारतीय संघाला मेलबर्नमध्ये संस्मरणीय विजय मिळवून दिला होता. पुन्हा एकदा भारताने बोर्डर – गावसकर चषक आपल्याकडेच राखला. भारताने मेलबर्नमध्ये एकूण १४ कसोटी खेळल्या आहेत. आणि यातील ४ जिंकताना ८ गमावल्या आहेत. आणि २ अनिर्णित राखल्या आहेत. (Boxing Day Test)

(हेही वाचा- ICC Test Championship : भारताला कसोटी अजिंक्यपदासाठी पाकिस्तानची होऊ शकते मदत)

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघानेही या मैदानावर खेळलेल्या एकूण ११६ कसोटींपैकी ६७ जिंकत ६० टक्के यशाची टक्केवारी राखली आहे. त्यांनी इथं ३२ कसोटी गमावल्या आहेत. तर १७ अनिर्णित राहिल्या आहेत. विशेष म्हणजे २०२० मध्ये भारताकडूनच झालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने इथं एकही कसोटी गमावलेली नाही. (Boxing Day Test)

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान मेलबर्न इथं झालेल्या कसोटी आणि त्यांचे निकाल पाहूया,  (Boxing Day Test)

तारीख
सामन्याचा निकाल

१ जानेवारी १९४८

भारताचा २३३ धावांनी पराभव

६ फेब्रुवारी १९४८

भारताचा १ डाव १७७ धावांनी पराभव

३० डिसेंबर १९६७

भारताचा १ डाव ४ धावांनी पराभव

३० डिसेंबर १९७७

भारताचा २०२ धावांनी विजय

७ फेब्रुवारी १९८१

भारताचा ५९ धावांनी विजय

२६ डिसेंबर १९८५

अनिर्णित

२६ डिसेंबर १९९१

भारताचा ८ गडी राखून पराभव

२६ डिसेंबर १९९९

भारताचा ८० धावांनी पराभव

२६ डिसेंबर २००३

भारताचा ९ गडी राखून पराभव

२६ डिसेंबर २००७

भारताचा ३३७ धावांनी पराभव

२६ डिसेंबर २०११

भारताचा १२१ धावांनी पराभव

२६ डिसेंबर २०१४

अनिर्णित

२६ डिसेंबर २०१८

भारताचा १३७ धावांनी विजय

२६ डिसेंबर २०२०

भारताचा ८ गडी राखून विजय

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.