cama hospital mumbai : काय आहे कामा हॉस्पिटलचा इतिहास?

30
cama hospital mumbai : काय आहे कामा हॉस्पिटलचा इतिहास?

नोव्हेंबर २००८ साली मुंबईत घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यांची मालिका अतिशय भयावह आणि अंगावर काटा आणणारी होती. त्यावेळी लष्कर-ए-तोयबा नावाच्या दहशतवादी संघटनेच्या १० सदस्यांनी मुंबईत सतत चार दिवस गोळीबार आणि बॉम्बस्फोट हल्ले केले. या हल्ल्यांचा जागतिक स्तरावर निषेध करण्यात आला. हा मृत्यूचा तांडव बुधवार २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी सुरू झाला आणि शनिवार २९ नोव्हेंबर २००८ पर्यंत सुरू राहिला होता. या हल्ल्यांमध्ये एकूण १७५ लोक मरण पावले आणि ३०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. (cama hospital mumbai)

हे दहशतवादी हल्ले दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ओबेरॉय ट्रायडंट, ताजमहाल पॅलेस आणि टॉवर हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरिमन हाऊस, मेट्रो सिनेमा आणि टाईम्सच्या मागे असलेल्या एका गल्लीमध्ये, टाईम्स ऑफ इंडिया बिल्डिंग आणि सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबईच्या बंदर परिसरातील माझगाव येथे आणि विलेपार्ले येथे टॅक्सीतही स्फोट झाला होता. २८ नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत ताज हॉटेलला सोडून इतर सर्व ठिकाणं मुंबई पोलिस आणि सुरक्षा दलांनी संरक्षित केली होती. २९ नोव्हेंबरच्या दिवशी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांनी म्हणजेच NSG ने उर्वरित हल्लेखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडो आयोजित केलं होतं. त्या ऑपरेशनमुळे ताज हॉटेलमधल्या उरलेल्या हल्लेखोरांचाही नायनाट झाला आणि हल्ले थांबले. दहशतवादी हल्ल्यांचं लक्ष्य झालेल्या ठिकाणांपैकी एक कामा हॉस्पिटल हे भारतात असलेलं मुंबई शहरातलं खास महिला आणि मुलांसाठी असलेलं ३६७ खाटा असलेलं हॉस्पिटल आहे. (cama hospital mumbai)

(हेही वाचा – Boxing Day Test : कशी आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांची मेलबर्नमधील कामगिरी?)

कामा हॉस्पिटलचा इतिहास

कामा हॉस्पिटलची पायाभरणी २२ नोव्हेंबर १८८३ साली H.R.H यांच्या हस्ते करण्यात आली होती. त्यानंतर हॉस्पिटल बांधून पूर्ण झाल्यावर ३० जुलै १८८६ साली ड्यूक ऑफ कॅनॉट यांच्या हस्ते कामा हॉस्पिटलचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं. कामा हॉस्पिटलच्या इमारतीची रचना खान बहादूर मुंचर्जी कॉवासजी मुर्जबान यांनी मध्ययुगीन गॉथिक शैलीमध्ये केली होती. कामा हॉस्पिटलची इमारत बांधण्यासाठी पोरबंदर येथून खास दगड आणले गेले होते. (cama hospital mumbai)

पेस्टोनजी होर्मुसजी कामा हे एक पारशी समाजसेवक होते. त्यांनी या हॉस्पिटलच्या बांधकामासाठी त्याकाळी ₹१००,००० चं योगदान दिलं होतं. मेडिकल वुमन फॉर इंडिया या फंडातून कामा हॉस्पिटलला कर्मचारी वर्ग प्रदान करण्यात आला होता. (cama hospital mumbai)

सुरुवातीला या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या सर्व नियुक्त्या तात्पुरत्या होत्या. पण पाच वर्षांनी त्यांत बदल केला गेला. एडिथ पेचे हॉस्पिटलमध्ये रुजू होणारी पहिली महिला डॉक्टर होती. १८६९ आली एडिनबर्ग विद्यापीठात महिला वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मूळ गटांपैकी ती एक होती. पेचे १८८६ ते १८९४ या सालादरम्यान हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी होत्या. हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या नर्सिंग स्कुलच्या स्थापनेमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. (cama hospital mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.