ahmedabad municipal corporation : अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं वैशिष्ट्य जाणून घेऊया

31
ahmedabad municipal corporation : अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं वैशिष्ट्य जाणून घेऊया

अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजेच एएमसीला अहमदाबाद महानगरपालिका म्हणूनही ओळखलं जातं. अहमदाबाद महानगरपालिका ही अहमदाबाद शहराच्या नागरी मूलभूत सुविधा आणि प्रशासनाचं व्यवस्थापन पाहते. एएमसीची स्थापना जुलै १९५० साली बॉम्बे प्रोव्हिन्शियल कॉर्पोरेशन ऍक्ट १९४९ च्या अंतर्गत झाली होती. (ahmedabad municipal corporation)

(हेही वाचा – cama hospital mumbai : काय आहे कामा हॉस्पिटलचा इतिहास?)

एएमसीचं प्रशासन

एएमसी ही ४८ निवडणूक विभागांमध्ये विभागली गेली आहे. त्यांचे प्रमुख महापौर आहेत. तरीही प्रशासकीय प्रमुख हा महापालिका आयुक्त असतो. हा महापालिका आयुक्त गुजरात सरकारने नियुक्त केलेला भारतीय प्रशासकीय सेवेचा अधिकारी असतो.

प्रशासकीय कारणामुळे शहर पूर्वी ५ झोनमध्ये विभागलं गेलं होतं. मध्य, पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण अशाप्रकारे ते भाग विभागले गेले होते. पण २०१३ साली ४६६ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेलं हे क्षेत्र न्यू वेस्ट झोन म्हणून ओळखलं जाऊ लागलं. हे क्षेत्र पूर्वी अहमदाबाद नागरी विकास प्राधिकरण म्हणजेच AUDA द्वारे चालवलं जात होते. २०१८ साली नवीन पश्चिम क्षेत्र हे पुढे उत्तर पश्चिम झोन आणि दक्षिण पश्चिम झोनमध्ये विभागलं गेलं. (ahmedabad municipal corporation)

(हेही वाचा – Boxing Day Test : कशी आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांची मेलबर्नमधील कामगिरी?)

अहमदाबाद शहर पाणी वितरण प्रणाली

घरगुती आणि व्यावसायिक कारणासाठी पाण्याचा पुरवठा पूर्ण करण्यासाठी एएमसी ही साबरमती नदी आणि नर्मदा कालव्याचा वापर पाणी पुरवठ्याचे दोन मुख्य स्त्रोत म्हणून केला जातो. तसंच पाणी पुरवठ्यासाठी भूजलाचाही स्त्रोत म्हणून वापर केला जातो.

सध्या एएमसी ही कोतारपूर, रस्का, दुधेश्वर आणि जसपूर ही चार प्रमुख जलशुद्धीकरण संयंत्रे चालवते. तसंच साबरमती नदीवर ७ कार्यरत असलेल्या फ्रेंच विहिरी आहेत. या विहिरी शहराचा पाणीपुरवठा वाढवतात. एएमसी ही तीच्या पाईपलाईनच्या नेटवर्कद्वारे संपूर्ण शहरातील ६ झोनमधल्या स्थित जल वितरण केंद्रांना पाणी पुरवते. (ahmedabad municipal corporation)

(हेही वाचा – Fake companies: देशात २.३३ लाख बनावट कंपन्या; सरकारच्या कारवाईतून आकडेवारी समोर)

अहमदाबाद शहर घनकचरा व्यवस्थापन प्रणाली

एएमसी ही १३० ट्रॅक्टर, ट्रक, जेसीबी इत्यादी उपकरणं आणि मशिनरी तैनात करून शहराच्या ६ झोनमध्ये असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणांहून १००० टन प्रतिदिन कचरा गोळा करते. एकूण ११७३ वाहनांचं ग्लोबल पोझिशनिंग सिस्टमद्वारे निरीक्षण केलं जातं. २०१७ साली एएमसी महामंडळाने सार्वजनिक-खासगी भागीदारी अंतर्गत घरोघरी ई-कचरा संकलन सुरू केलं आहे. ई-कचरा विलगीकरणासाठी संपूर्ण शहरात एकूण ६ संकलन केंद्रे उघडली आहेत. (ahmedabad municipal corporation)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.