National Farmers Day : राष्ट्रीय शेतकरी दिवसाबद्दल जाणून घ्या ही विशेष माहिती

44
National Farmers Day : राष्ट्रीय शेतकरी दिवसाबद्दल जाणून घ्या ही विशेष माहिती

राष्ट्रीय शेतकरी दिवस हा हिंदीमध्ये किसान दिवस म्हणूनही ओळखला जातो. शेतकरी दिन हा दरवर्षी २३ डिसेंबर या दिवशी भारताचे पाचवे पंतप्रधान, चौधरी चरण सिंह यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो. चौधरी चरण सिंह हे शेतकरी नेते होते. त्यांनी भारतातल्या शेतकऱ्यांचं जीवन सुधारण्यासाठी अनेक धोरणे आखली होती. राष्ट्रीय शेतकरी दिवस हा वेगवेगळे कार्यक्रम, वादविवाद, परिसंवाद, प्रश्नमंजुषा स्पर्धा, चर्चा, कार्यशाळा, प्रदर्शने, निबंध लेखन स्पर्धा आणि इतर अनेक कार्यक्रम आयोजित करून साजरा केला जातो. (National Farmers Day)

चौधरी चरणसिंग यांना चरण सिंह या नावानेही ओळखलं जातं. ते भारतीय राजकारणी आणि स्वातंत्र्यनेते होते. चरण सिंह हे मुख्यतः त्यांच्या जमीन आणि कृषी सुधारणा उपक्रमांसाठी ओळखले जातात. जुलै १९७९ ते ऑगस्ट १९७९ या काळात त्यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून काही काळ काम केलं होतं. तसंच ते बागपतचे एमपी होते. पंतप्रधान असताना ते जनता पक्षाचे सदस्य होते. तसंच त्यांनी भारतीय क्रांती दलाचे सदस्य असताना उत्तर प्रदेशाचे पाचवे मुख्यमंत्री म्हणूनही काम केलं होतं. जनता पक्षाचे सदस्य म्हणून त्यांनी जानेवारी १९७९ ते जुलै १९७९ या कालावधीत भारताचे उपपंतप्रधान म्हणूनही काम सांभाळलं होतं. (National Farmers Day)

(हेही वाचा – Fake companies: देशात २.३३ लाख बनावट कंपन्या; सरकारच्या कारवाईतून आकडेवारी समोर)

चौधरी चरण सिंह यांना “शेतकऱ्यांचा चॅम्पियन” म्हणून ओळखलं जातं. त्यांनी आपलं आयुष्य शेतकऱ्यांच्या कल्याण आणि हक्कांसाठी वकिल म्हणून लढा देण्यात समर्पित केलं होतं. चौधरी चरण सिंह यांचा जन्म मेरठ जिल्ह्यामध्ये आग्रा आणि अवध या संयुक्त प्रांतात झाला होता. त्यांनी १९२३ साली आग्रा कॉलेजमधून विज्ञान शाखेमध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर १९२५ साली त्यांनी इतिहास हा विषय घेऊन मास्टर ऑफ आर्ट्सचं पदवी शिक्षण पूर्ण केलं. पुढे १९२७ साली त्यांनी मेरठ कॉलेजमधून बॅचलर ऑफ लॉचं पदवी शिक्षण पूर्ण केलं. (National Farmers Day)

इंग्रजांच्या विरोधात भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढताना चौधरी चरण सिंह यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला होता.
१९३० साली इंग्रजांनी त्यांना १२ वर्षांसाठी तुरुंगात पाठवलं होतं. त्यानंतर नोव्हेंबर १९४० साली त्यांना पुन्हा एका वर्षासाठी तुरुंगवास भोगावा लागला. ऑगस्ट १९४२ साली त्यांना इंग्रजांनी डीआयआर अंतर्गत पुन्हा तुरुंगात टाकलं आणि नोव्हेंबर १९४३ साली त्यांची सुटका झाली. त्यांनी स्वतःच्या लोकदल पक्षाची स्थापना केली. त्यांनी उत्तर भारतात आपलं सरकार स्थापन केलं आणि ते उत्तर प्रदेशाचे पाचवे मुख्यमंत्री बनले. या वर्षी म्हणजेच २०२४ साली त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. (National Farmers Day)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.