Boxing Day Test : गोलंदाजांच्या मानगुटीवरील ट्रेव्हिस हेडचं भूत कसं उतरवायचं?

Boxing Day Test : ट्रेव्हिस हेड हा एकमेव ऑस्ट्रेलियन फलंदाजाने बुमराहविरुद्ध धावा केल्या आहेत.

41
Boxing Day Test : गोलंदाजांच्या मानगुटीवरील ट्रेव्हिस हेडचं भूत कसं उतरवायचं?
  • ऋजुता लुकतुके

बोर्डर-गावस्कर मालिका सध्या १-१ अशा बरोबरीत आहे आणि उर्वरित दोन कसोटींत भारतील संघाला ऑस्ट्रेलियाला आवर घालायचा असेल तर गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरलेल्या ट्रेव्हिस हेडला कसा आवर घालायचा याची रणनीती भारतीय संघाला तयार करावी लागणार आहे. या मालिकेतील आतापर्यंतच्या ५ डावांमध्ये हेडने ८०.८१ धावांच्या सरासरीने तब्बल ४०९ धावा लुटल्या आहेत. ऑस्ट्रेलियाची आघाडीची फळी अपयशी ठरत असताना हेडने मात्र मधली फळी सांधून ठेवण्याचं काम केलं आहे. (Boxing Day Test)

अशावेळी हेडला कसं बाद करायचं हा भारतीय गोलंदाजांसमोरचा प्रश्न आहे. ऑस्ट्रेलियात मजबूत फलंदाजी करणारा चेतेश्वर पुजारा आणि भारतीय संघाचा फलंदाजीचा माजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी भारतीय गोलंदाजांना त्यासाठी काही सूचना केल्या आहेत. ‘गोलंदाजीची दिशा मधल्या यष्टीवर असेल तर डावाच्या सुरुवातीला हेड अडखळतो. तीच वेळ आहे त्याच्यावर दडपण वाढवण्याची. पण, चेंडूची दिशा कधीही त्याच्या डाव्या यष्टीबाहेर जाता कामा नये,’ असं पुजाराने स्टार स्पोर्ट्‌सवर बोलताना सूचवलं आहे. (Boxing Day Test)

(हेही वाचा – National Farmers Day : राष्ट्रीय शेतकरी दिवसाबद्दल जाणून घ्या ही विशेष माहिती)

दुसरा सल्ला पुजारानेच दिला आहे तो आखूड टप्प्याच्या चेंडूंचा. ‘आखूड टप्प्यावरही हेड आपले फटके खेळतो. पण, ते खेळताना त्याच्याकडून चूक होऊ शकते. कारण, पूर्वी तसं दिसलं आहे. त्यामुळे तो आल्या आल्या आखूड टप्प्याचा मारा केला तर तो सावध होईल आणि ती वेळ त्याला बाद करण्यासाठी योग्य असेल,’ असं पुजाराला वाटतं. (Boxing Day Test)

तर संजय बांगरने पुजारा दुजोरा देतानाच ही रणनीती जास्त विषद करून सांगितली. ‘हेडविरुद्ध खेळताना दोन योजना तयार ठेवा. पहिली योजना अशी की, पहिले १०-१५ चेंडू सातत्याने मधल्या आणि डाव्या यष्टीवर टाकायचे. तो कसा खेळतो, याचा अंदाज घ्यायचा. सुरुवातीला यष्टीच्या अराऊंड द विकेट गोलंदाजी करायची. ते जमलं नाही तर राऊंड विकेट यायचं. आणि यावेळी ऑन साईडला जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक ठेवायचे,’ असं बांगरने सांगितलं. बांगरनेही मधल्या यष्टीवर सातत्याने मारा करत आखूड टप्प्याचे चेंडू मध्ये मध्ये खुबीने पेरण्याचा सल्ला बुमराह आणि प्रभृतींना दिला आहे. (Boxing Day Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.