पाकिस्तानात (Pakistan) दहशतवाद्यांना ट्रेनिंग देणारा आणि जम्मू काश्मीरमध्ये २०११ मध्ये एका मौलानाच्या हत्येचा आरोपी असणारा दहशतवादी जावेद मुंशी (Javed Munshi ) याला पश्चिम बंगालच्या (West Bengal) दक्षिण २४ परगना जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. जम्मू काश्मीर पोलिस आणि पश्चिम बंगाल पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ही अटक करण्यात आली.
( हेही वाचा : Uttar Pradesh मध्ये 3 खलिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान)
वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिबंधीत दहशतवादी संघटना तहरीक-उल- मुजाहिद्दीनचा सदस्य जावेद मुंशी (Javed Munshi ) शॉल विक्रेता म्हणून काम करत होता. तो नदीच्या रस्ते बांगलादेश पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. पोलिसांनी सांगितले की, ह्त्यारे आणि बॉम्ब बनवण्याचा विशेषज्ञ असणारा मुंशी लष्कर-ए-तोयबाच्या आदेशावर काम करत होता. (Pakistan) पोलिसांनी दि. २२ डिसेंबर रोजी जावेद मुंशी (Javed Munshi ) याला गुलशन हाऊस नावाच्या भाड्याच्या घरात अटक केली. जिथे तो आपले नातेवाईक तबस्सुम आणि तिचा नवरा गोलाम मोहम्मदसोबत राहत होता. तबस्सुमने सांगितले की, मुंशी तिच्या बहिणीचा पती आहे. तो २५ वर्ष त्यांच्या कुटुंबाचा भाग असल्याची माहितीही तबस्सुमने दिली. (West Bengal)
मुंशीला कोलकताच्या अलीपुर न्यायालयात (Alipore District & Session Court) हजर केले जाणार आहे. जिथे न्यायालयाने त्याला ट्रान्झिट रिमांडवर जम्मू-काश्मीर पोलिसांच्या ताब्यात दिले. आता त्याला चौकशीसाठी श्रीनगरला नेण्यात येणार असून त्याच्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तपासणीत माहिती पडले की, मुंशी (Javed Munshi ) पाकिस्तान, नेपाल आणि बांगलादेशात प्रवास केला असून त्याने पाकिस्तानाच्या बनावट पासपोर्टचा वापर केला होता. तो अनेक वेळा दशतवादी कृत्यांच्या आरोपाखाली तुरुंगावारी करून आलेला असल्याची ही माहिती आहे.
२०११ मध्ये श्रीनगरमध्ये अहल-ए-हदीसचा नेता शोकत अहमद शाह यांची हत्या करण्याच्या प्रकरणात मुंशी (Javed Munshi ) यांचे नाव समोर आले आहेत. त्यावेळी एका सायकलमध्ये आईईडी बॉम्ब स्फोट झाल्याने शाह यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मुंशी (Javed Munshi ) फरार झाला होता. STF चे अधिकाऱ्याने सांगितले की, मुंशी बांगलादेशात पळून जाण्याची तयारी करत होता. मात्र काश्मीर पोलिसांना मिळालेल्या माहितीमुळे त्याला अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेमुळे सुरक्षा संस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Pakistan)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community