Pooja Khedkar यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; कधीही होणार अटक

77

बरखास्त प्रशिक्षित आयएएस अधिकारी पूजा खेडकरला (Pooja Khedkar) दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. ट्रायल कोर्टाच्या निर्णयाविरोधात पूजा खेडकर हिने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ट्राल कोर्टाने पूजा खेडकर हिला अंतरिम जामीन देण्याचा नकार दिला होता. त्यानंतर पूजा खेडकर हिने या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत आव्हान दिले होते. मात्र ही याचिका फेटाळण्यात आल्याने आता पूजा खेडकर हिच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. तसेच तिला कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते.

(हेही वाचा पश्चिम बंगालमध्ये पाकिस्तानी दहशतवादी Javed Munshi ला अटक; हत्यारे आणि बॉम्ब बनवण्यात निष्णात)

पूजा खेडेकर (Pooja Khedkar) हिला ऑगस्ट महिन्यात अटकेपासून संरक्षण मिळाले होते. मात्र आता दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे तिच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सांगितले की, याचिकाकर्त्याचे आचरण हे समाजातील वंचित समुहांसाठीच्या योजनांचा लाभ घेण्याच्या उद्देशाने प्रेरित आहे. मात्र त्या वंचित समुहांसाठीच्या तरतुदींचा लाभ घेण्यास पात्र नसल्याचे तपासामधून दिसून येत आहे. आलिशान वाहनांचे मालक असण्याबरोबरच याचिकाकर्त्याचे आई-वडील प्रभावशाली आहेत, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. पूजा खेडकर (Pooja Khedkar) हिने उचलेली पावले ही व्यवस्थेत फेरफार करण्याच्या एका मोठ्या कटाचा भाग होती.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.