Bangladesh मध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकाचा अपमान; गळ्यात घातला चपलांचा हार

82
Bangladesh मध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकाचा अपमान; गळ्यात घातला चपलांचा हार
Bangladesh मध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकाचा अपमान; गळ्यात घातला चपलांचा हार

बांगलादेशातील (Bangladesh) हिंदूंवर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने अत्याचार होत आहेत. त्यातच आता बांगलादेशात देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचाही अपमान केला जात आहे. बांगलादेशातील (Bangladesh) ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक असलेल्या अब्दुल हई कानू (Abdul Hai Kanu) यांच्या गळ्यात चपलांचा हार घालून त्यांचा जाहीर अपमान करण्यात आल्याची माहिती शेख हसिना (Sheikh Hasina) यांच्या अवामी लीग पक्षाने सोशल मीडियावर दिली.

( हेही वाचा : पश्चिम बंगालमध्ये पाकिस्तानी दहशतवादी Javed Munshi ला अटक; हत्यारे आणि बॉम्ब बनवण्यात निष्णात

अवामी लीगने (Awami League)सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत लिहले की, स्वातंत्र्यलढ्यादरम्यान सेवा देणारे एक सन्माननीय स्वातंत्र्यसैनिक अब्दुल हई कानू यांच्या गळ्यात चपलांचा हार घालून अपमानित करण्यात आलं आहे. १९७१ मधील स्वातंत्र्यविरोधी घटकांच्या सध्याच्या सहकाऱ्यांनी कोमिलामधील चौड्डाग्राम उपजिल्ह्यातील एक सन्माननीय स्वातंत्र्यसैनिक असलेल्या कानू याचं त्यांच्या घरामधून एक टोळक्याने अपहरण केले, असा दावा अवामी लीगने (Awami League)केला. (Bangladesh)

अवामी लीगने लिहले की, हे निंदनीय कृत्य केवळ एका व्यक्तीवरील हल्ला नाही तर देशाच्या स्वातंत्र्याची मूल्ये आणि आमच्या मुक्तीसंग्रामातील नायकांच्या सन्मानावरील हल्ला आहे. आमच्या युद्धनायकांविरोधात अशा प्रकारची कृत्ये सहन केली जाणार नाहीत. हा बांगलादेशाच्या (Bangladesh) इतिहासावर थेट हल्ला आहे, आपल्याला याविरोधात लढावे लागेल, असे ही अवामी लीगने (Awami League) म्हटले. (Bangladesh)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.