जातीय द्वेष निर्माण करणे हे राहुल गांधींचे एकमेव ध्येय; Devendra Fadnavis यांचा हल्लाबोल

39
जातीय द्वेष निर्माण करणे हे राहुल गांधींचे एकमेव ध्येय; Devendra Fadnavis यांचा हल्लाबोल
जातीय द्वेष निर्माण करणे हे राहुल गांधींचे एकमेव ध्येय; Devendra Fadnavis यांचा हल्लाबोल

काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दि. २३ डिसेंबर रोजी परभणीत जाऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. भेटीदरम्यान त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर आरोप करत टीका केली आहे. त्यावेळी राहुल गांधी म्हणाले की, सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) हा दलित होता म्हणून त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला असून कस्टोडिअल डेथ ही गृहमंत्र्यांची जबाबदारी असते, असा आरोपही गांधींनी (Rahul Gandhi) मुख्यमंत्र्यांवर केला. याप्रकरणी पुण्यात माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) गांधींच्या जातीयद्वेषाच्या नॅरेटिव्हवर प्रहार केला आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, राहुल गांधी (Rahul Gandhi) हे केवळ राजकीय हेतूने परभणीत आले होते. ही केवळ राजकीय भेट होती. राज्यात जाती-जातींमध्ये विद्वेष निर्माण करायचा, एवढं एकमेव त्यांचं ध्येय आहे. हेच काम गेली अनेक वर्षं ते सातत्याने करत आहेत. त्यामुळे हे जे त्यांचं विद्वेषाचं काम आहे ते त्यांनी त्या ठिकाणी जाऊन केलेलं आहे. महाराष्ट्राचे सरकार संवेदनशील असल्यामुळेच परभणी प्रकरणाची आम्ही न्यायालयीन चौकशी घोषित केलेली आहे. या न्यायालयीन चौकशीमध्ये यासंदर्भातील सगळं सत्य आणि तथ्य बाहेर येईल. काहीही लपवण्याचं कारण नाही. जर या चौकशीमध्ये मारहाणीमध्ये किंवा अशा प्रकारच्या गोष्टीमुळे हा मृत्यू झाल्याचे समोर आल्यास कोणालाही सोडलं जाणार नाही. कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन ही फडणवीसांनी दिले. (Devendra Fadnavis)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.