महिलांना प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी बनवण्याचा सरकारचा प्रयत्न; पंतप्रधान Narendra Modi यांचे विधान

40
महिलांना प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी बनवण्याचा सरकारचा प्रयत्न; पंतप्रधान Narendra Modi यांचे विधान
महिलांना प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी बनवण्याचा सरकारचा प्रयत्न; पंतप्रधान Narendra Modi यांचे विधान

महिलांना प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी बनविण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दि. २३ डिसेंबर रोजी केले. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याला संबोधित करत असताना ते बोलत होते. यावेळी पंतप्रधानांनी सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नवनियुक्त ७१,००० हून अधिक युवांना नियुक्ती पत्रांचे वितरण केले. (Narendra Modi)

(हेही वाचा : Rahul Gandhi परभणीत आले; पण वीर सावरकरांच्या बदनामी खटल्यात न्यायालयात उपस्थित रहायला वेळ नाही; हा न्यायालयाचा अवमान

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सरकारने प्रत्येक नागरिकाला विमा संरक्षण देण्यासाठी विमा सखी योजना सुरू केली, ज्यामुळे ग्रामीण भागातील महिलांसाठी रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या, यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. त्याचबरोबर ड्रोन दीदी(Namo Drone Didi) , लखपती दीदी (Lakhpati Didi Yojana) आणि बँक सखी योजना यासारख्या उपक्रमांमुळे कृषी आणि ग्रामीण क्षेत्रातही रोजगार निर्माण होत आहेत, असेही मोदी म्हणाले. महिलांना प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. २६ आठवड्यांची प्रसूती रजा मिळण्याचा नियम लागू केल्याने लाखो महिलांच्या करिअरचे रक्षण झाले आहे.

दरम्यान सुकन्या समृद्धी योजनेमुळे मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ मिळाले आहे. मुद्रा योजनेच्या (Pradhan Mantri Mudra Yojna) माध्यमातून महिला आता तारणमुक्त कर्ज मिळवू शकतात. प्रधानमंत्री आवास योजनेने हे सुनिश्चित केले आहे की, वाटप करण्यात आलेली बहुतांश घरे महिलांच्या नावावर आहेत. नारी शक्ती वंदन अधिनियमाने (Nari Shakti Vandan Adhiniyam) महिलांना विधानसभा आणि लोकसभेत आरक्षण सुनिश्चित केले आहे. त्यामुळे महिलांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होईल, यावर पंतप्रधानांनी (Narendra Modi)भर दिला.

तसेच यावेळी ७१,००० पेक्षा जास्त युवांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. गेल्या दीड वर्षात सुमारे १० लाख स्थायी सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या असून यामुळे एक उल्लेखनीय विक्रम प्रस्थापित झाला आहे. या नोकऱ्या संपूर्ण पारदर्शकता राखून दिल्या जात आहेत आणि नवे नियुक्त कर्मचारी समर्पित वृत्ती आणि एकात्मतेने देशाची सेवा करत आहेत, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. त्याचबरोबर रोजगार मेळ्यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून भारताच्या युवा वर्गाच्या गुणवत्तेचा पुरेपूर वापर करण्याला सरकार प्राधान्य देत असल्यावर पंतप्रधानांनी (Narendra Modi)भर दिला. गेल्या १० वर्षात विविध मंत्रालये आणि विभागात सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी अतिशय ठामपणे प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती ही पंतप्रधानांनी (Narendra Modi)दिली.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.