Ashish Shelar यांचे ‘गृह’ स्वप्नभंग, मुंबईचे ‘पालकत्व’ तरी मिळेल का ?

72
Ashish Shelar यांचे ‘गृह’ स्वप्नभंग, मुंबईचे ‘पालकत्व’ तरी मिळेल का ?
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

भाजपाचे मुंबई अध्यक्ष आणि वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्राचे आमदार ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांची अखेर मंत्रीपदी वर्णी लागली. यांच्याकडे माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य खाते त्यांच्याकडे देण्यात आले आहे. मात्र मागील सरकारमध्ये आपणच गृहनिर्माण मंत्री होणार असे सर्वत्र वातावरण निर्माण करणारे आशिष शेलार यांना काही गृहनिर्माण मंत्री पद मिळाले नाही. आशिष शेलार यांच्या स्वप्नाला भाजपाने छेद देत हे खाते शिवसेनेला सोडले गेले आणि त्यामुळे शेलारांचे स्वप्न भंगले गेले. त्यामुळे आता त्यांना केवळ माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य आदी खात्यांवरच समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे गृह स्वप्न भंगल्यामुळे मुंबईचे पालकत्व तरी मिळेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्यात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्यानंतर अनेक दिवसांनी ३३ कॅबिनेट मंत्री आणि ०६ राज्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला. परंतु विधीमंडळ अधिवेशनापूर्वी ३९ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला असला तरी प्रत्यक्षात खातेवाटप हे अधिवेशनाचे सुप वाजल्यानंतरच जाहीर करण्यात आले आहे. या मंत्रिमंडळात भाजपाचे मुंबई अध्यक्ष तथा वांद्रे पश्चिममधील आमदार ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांचीही वर्णी लागली गेली आणि त्यांच्याकडे माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्यमंत्री पदाचा कार्यार सोपवण्यात आला.

(हेही वाचा – महिलांना प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी बनवण्याचा सरकारचा प्रयत्न; पंतप्रधान Narendra Modi यांचे विधान)

शेलार हे माहिती व तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री बनले असले तरी गृहनिर्माण मंत्री बनणे हे त्यांचे स्वप्न होते. यापूर्वीच्या सरकारमध्ये आपली वर्णी लागेल आणि मी गृहनिर्माण मंत्री बनेन अशाप्रकारे सर्वंत्र वातावरण निर्माण शेलार यांच्याकडून केले जात होते. परंतु राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे सरकार आल्यानंतर गृह पदावरून झालेल्या वादानंतर गृहनिर्माण मंत्रिपद हे शिवसेनेच्या वाट्याला सोडले गेले. त्यामुळे शेलारांना (Ashish Shelar) गृहनिर्माण मंत्रिपद मिळणार नाही हे निश्चित झाले होते. त्यामुळे शेलारांना नक्की कोणते पद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते.

त्यामुळे गृहनिर्माण मंत्रिपदाचे गृहस्वप्न केवळ भाजपाच्या वाट्याला हे पद न आल्याने भंगले गेले असल्याने आता महिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री पदाचा भार सोपवल्याने या खात्यावरच आता समाधान मानण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे मुंबईतून आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा हे दोनच मंत्री बनल्याने मुंबई शहर आणि उपनगरचे पालकमंत्री होती अशी दाट शक्यता आहे. परंतु यापैंकी शेलार (Ashish Shelar) यांना पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. शेलार यांना एक तर शहर भागाचे पालकमंत्री मिळेल किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळेल आणि नितेश राणे यांना शहर विभागाचे पालकमंत्री मिळेल अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.