चित्रपट दिग्दर्शक Shyam Benegal यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन

43
चित्रपट दिग्दर्शक Shyam Benegal यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन
चित्रपट दिग्दर्शक Shyam Benegal यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन

सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल (Shyam Benegal) यांचे दि. २३ डिसेंबर रोजी वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. त्यांनी मुंबई सेंट्रल येथील वॉकहार्ट रुग्णालयात (Wockhardt Hospitals) शेवटचा श्वास घेतला. श्याम बेनेगल यांनी सर्वाधिक नॅशनल अवॉर्ड जिंकण्याचा विक्रम आपल्या नावे केलेला आहे . १९७४ साली श्याम बेनेगल यांनी ‘अंकुर’ या चित्रपटातून दिग्दर्शनाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी निशांत, मंथन, भूमिका, सरदारी बेगम यांसारख्या अविस्मरणीय चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

(हेही वाचा : Ashish Shelar यांचे ‘गृह’ स्वप्नभंग, मुंबईचे ‘पालकत्व’ तरी मिळेल का ?

दरम्यान श्याम बेनेगल (Shyam Benegal) यांच्यावर दि. २४ डिसेंबर रोजी अत्यसंस्कार होणार आहेत. त्यांची मुलगी पिया बेनेगल यांनी सांगितले की, खुप दिवसांपासून श्याम बेनेगल हे किडनीशी संबंधित आजारापासून त्रस्त होते. दोन वर्षापूर्वी त्यांच्या दोन्ही किडनी खराब झाल्या होत्या. त्यानंतर त्यांचे डायलिसिसचा उपचार सुरु होते.

वडीलांच्या कॅमेऱ्यात वयाच्या १२ व्या वर्षी पहिली चित्रपट बनवला

श्यान बेनेगल (Shyam Benegal) यांचा जन्म १४ डिसेंबर १९३४ रोजी हैदराबादच्या ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांनी अर्थशास्त्र विषयात शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी फोटेग्राफीला सुरुवात केली. बॉलीवुडमध्ये बेनेगल यांना आर्ट सिनेमाचे जनक म्हणूनही ओळखले जाते. जेव्हा ते बारा वर्षाचे होते तेव्हा त्यांनी वडील श्रीधर बी. बेनेगल (Sridhar B. Benegal) यांच्या कॅमेऱ्यातून आपला पहिला चित्रपट बनवला होता. त्यांच्या कुटुंबात त्यांच्या पश्चात पत्नी नीरा बेनेगल आणि मुलगी पिया बेनेगल आहेत.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.