कौशल्य विकासमंत्री Mangal Prabhat Lodha यांनी स्वीकारला पदभार; पहिल्या वर्षी ‘इतके’ लाख रोजगार देणार

241
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी कौशल्य विकासाची महाराष्ट्राला असलेली गरज ओळखली आणि त्याला नेहमीच महत्त्व दिले आहे. अगदी थोड्या कालावधीत म्हणजे येत्या १०० दिवसांसाठी माझ्या विभागाच्या कामांची रूपरेषा मुख्यमंत्र्यांना देणार आहे. पहिल्या वर्षात ५ लाख युवकांना रोजगार देण्याचे माझ्या विभागाचे लक्ष्य आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा (Skill Development Minister Mangal Prabhat Lodha) यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. (Mangal Prabhat Lodha)

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात (Maharashtra State Skills University) मंत्री लोढा यांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचा कार्यभार स्वीकारला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच पुढील ५ वर्षांचे ध्येय गाठण्यासाठी सोमवारपासूनच कार्याला सुरुवात करणार आहोत, असे सांगितले.

(हेही वाचा – Bandra Fire: वांद्रे येथील निवासी इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल)

वर्ल्ड बँकेच्या प्रतिनिधींसह विभागाची प्रथम बैठक
सोमवारी कार्यभार स्वीकारल्यानंतर लोढा यांनी लगेचच वर्ल्ड बँकेच्या (World Bank) प्रतिनिधींसह विभागाची प्रथम बैठक घेतली. वर्ल्ड बँकेने कौशल्य विकास, शासकीय औद्योगिक संस्थांचे उन्नतीकरण, रोजगार प्रशिक्षण या सर्व उपक्रमांसाठी ₹२२०० कोटींचे कर्ज कौशल्य विकास विभागाला दिले आहे. सर्व तरतुदी पूर्ण करून कर्जाची रक्कम लवकरात लवकर विभागाला कशी मिळेल, यासाठी आजच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारद्वारे भारतातील १००० शासकीय औद्योगिक संस्थांना सहभागी केले आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त ITI चा यामध्ये समावेश असावा, यासाठी लवकरच केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांची भेट घेणार असल्याचे देखील मंत्री लोढा यांनी सोमवारी सांगितले. 
शनिवार, 21 डिसेंबरला रात्री जाहीर झालेल्या मंत्रिमंडळ खातेवाटपामध्ये मलबार हिल मतदारसंघाचे आमदार, माजी मंत्री मंगलप्रभात लोढा यांना कौशल्य विकास विभागाचे (Skill Development Department) खाते देण्यात आले. मागील कार्यकाळातही लोढा हे कौशल्य विकास विभागाचे मंत्री होते. होती. त्यांच्या काळात महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठाची स्थापना झाली. त्यांनी घेतलेल्या प्रमुख  निर्णयांमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, आयटीआयचे नामांतरण,’हर घर दुर्गा अभियान’ असे असंख्य निर्णय होते.

(हेही वाचा – Roads in Mumbai : अधिकारी म्हणतील तिथे नाही, तर जनता सांगेल त्या भागाचीच तपासणी करा; मीरा कामत यांची मागणी)

मागील सरकारच्या काळात लोढा हे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. उच्चभ्रु लोकांचा मतदार संघ असलेल्या  मलबार हिल विधानसभा मतदारसंघातून  मंगलप्रभात लोढा हे 1995 पासून आमदार आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीतही ते  विक्रमी मताधिक्क्याने ते निवडून आले आहेत.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.