-
ऋजुता लुकतुके
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीने (Vinod Kambli) प्रकृती अस्वास्थ्याची तक्रार केल्यामुळे त्याला ठाण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अलीकडेच अनेकदा त्याची तब्येत ढासळली आहे. रमाकांत आचरेकर सरांच्या शिवाजी पार्क येथील स्मारकाच्या कार्यक्रमात विनोद कांबळीने (Vinod Kambli) अनेक दिवसांनंतर लोकांना जाहीर दर्शन दिलं. या कार्यक्रमात त्याची ढासळलेली तब्येत सगळ्यांनी पाहिली आहे. सध्या ठाण्यातील आकृती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
‘५२ वर्षीय क्रिकेटपटूची प्रकृती सध्या स्थिर असली तरी ती गंभीरच आहे. तब्येतीचे बाकीचे अपडेट गुप्त ठेवण्यात आले आहेत,’ असं आयएएनएस वृत्तसंस्थेशी बोलताना प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. कांबळीच्या तब्येतीची जाहीर चर्चा झाल्यानंतर माजी क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) आणि सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी कांबळीला रिहॅब केंद्रात दाखल करण्याची आणि त्याचा खर्च उचलण्याची तयारी दाखवली होती.
(हेही वाचा – Boxing Day Test : ऑस्ट्रेलियातील उर्वरित दोन कसोटींत अश्विनच्या जागी तनुष कोटियन भारतीय संघात दाखल)
In pictures: Cricketer Vinod Kambli’s condition deteriorated again, leading to his admission at Akriti Hospital in Thane late Saturday night. His condition is now stable but remains critical. pic.twitter.com/7NBektzQ54
— IANS (@ians_india) December 23, 2024
(हेही वाचा – No Detention Policy : ५ आणि ८ वीच्या विद्यार्थ्यांची ढकलगाडी बंद; केंद्र सरकारचा मोठा निर्णय)
कांबळीने अलीकडेच एका युट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या एका तब्येतीच्या तक्रारीविषयी भाष्य केलं होतं. ‘मला एका महिन्यापूर्वी लघवीचा त्रास होऊ लागला. लघवी थांबेचना. माझा मुलगा जिझस क्रिस्तियानोनं मला माझ्या पायावर उभं राहायला मदत केली. मला ते ही जमत नव्हतं. माझी १० वर्षांची मुलगी आणि पत्नी यांनी मला सावरलं. माझं डोकं गरगरत होतं. मी थोड्याच क्षणात खाली कोसळलो. मग डॉक्टरना बोलावण्यात आलं. त्यांनी मला रुग्णालयात दाखल करून घेतलं,’ असं एका महिन्यापूर्वी कांबळीने विकी लालवानीच्या युट्यूब वाहिनीवर सांगितलं होतं.
२०१३ मध्ये त्याच्यावर दोनदा ह्रदय शस्त्रक्रिया झाल्याचंही तेव्हा कांबळीने सांगितलं होतं. या दोन्ही उपचारांचा खर्च सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) केल्याचंही कांबळीने सांगितलं. विनोद कांबळी (Vinod Kambli) ९ वर्षं भारतीय क्रिकेटमध्ये सक्रिय होता. भारताकडून तो १७ कसोटी आणि १०४ एकदिवसीय सामने खेळला. सलग दोन कसोटींत द्विशतक झळकावणारा तो भारताचा पहिला फलंदाज आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community