-
ऋजुता लुकतुके
भारताचा स्टार तेज गोलंदाज ऑस्ट्रेलियाला जाण्याइतका तंदुरुस्त नसल्याचा निर्वाळा बीसीसीआयने (BCCI) दिला आहे. गोलंदाजी केल्यानंतर त्याच्या गुडघ्याला अजून सूज येत आहे. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेट खेळत असला तरी शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणं अशक्य असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. जेव्हापासून शमी (Mohammed Shami) रणजी करंडकात (Ranji Trophy) शेवटचे दोन सामने बंगालकडून खेळला, तेव्हापासून तो ऑस्ट्रेलियाला कधी जाणार असा प्रश्न मीडियाकडून विचारला जात होता.
‘बीसीसीआयचा (BCCI) वैद्यकीय चमू कायम शामीबरोबर आहे. आणि त्याच्या दुखापतीबरोबरच तंदुरुस्तीवर लक्ष ठेवून आहे. त्याला झालेल्या घोट्याच्या दुखापतीतून आता तो पूर्णपणे सावरला आहे. पण, सामन्यांमध्ये गोलंदाजीचा वेळ वाढल्यानंतर शमीचा गुडघा थोडा सुजतो आहे. मोठ्या दुखापतीतून सावरताना असं होतंच. त्यामुळे हे काळजी करण्यासारखं नसलं, तरी शमी (Mohammed Shami) इतक्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही,’ असं बीसीसीआयने (BCCI) पत्र काढूनच स्पष्ट केलं आहे.
(हेही वाचा – Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता देण्याची प्रक्रिया सुरु; २१०० रुपयांचा हप्त कधीपासून मिळणार ?)
🚨 News 🚨
Medical & Fitness Update on Mohammed Shami #TeamIndia
Read 🔽
— BCCI (@BCCI) December 23, 2024
(हेही वाचा – Weather Update: राज्यात थंडीनंतर पुन्हा पावसाळा; हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो?)
एका वर्षाच्या ब्रेकनंतर नोव्हेंबरमध्ये मोहम्मद शमी (Mohammed Shami) पहिल्यांदा रणजी करंडकातील (Ranji Trophy) मध्यप्रदेश विरुद्धचा सामना खेळला. या कसोटीत शमीने ४३ षटकं टाकली. त्यानंतर सय्यद अली टी-२० स्पर्धेत तो सलग ९ सामने खेळला. आणि या पूर्ण कालावधीत तो सामन्याबरोबरच सराव सत्रांमध्येही सहभागी झाला. शिवाय टी-२० स्पर्धेदरम्यान बीसीसीआयकडून शमीसाठी खास सराव सत्र आयोजित केली जात होती. बोर्डर – गावसकर मालिकेचा (Border – Gavaskar series) विचार करूनच शमीची तयारी सुरू होती. पण, गुडघ्याची सूज अजून थांबली नसल्याने बीसीसीआयच्या (BCCI) वैद्यकीय चमूने त्याची तपासणी करून त्याला उर्वरित दोन कसोटींसाठी न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
‘शमीची ताकद आणि दीर्घ काळ खेळण्याची क्षमता वाढावी यासाठी वैद्यकीय चमू आता त्याच्यावर काम करत आहे. त्यातूनच त्याची तंदुरुस्ती वाढेल. कसोटी खेळण्याइतका तो सध्या तंदुरुस्त नाही. आणि विजय हजारे करंडकातील त्याचा सहभागही त्याची तंदुरुस्ती पाहूनच घेतला जाईल,’ असं बीसीसीआयने (BCCI) स्पष्ट केलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community