-
ऋजुता लुकतुके
भारताची दोन ऑलिम्पिक पदकं विजेती बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू (P V Sindhu) उदयपूरमध्ये पारंपरिक पद्धतीने झालेल्या सोहळ्यात विवाहबद्ध झाली आहे. राजस्थानमध्ये जयपूर इथं दोन दिवसांचा हा विवाह सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचा पहिला फोटो केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटनमंत्री गजेंद्रसिंग शेखावत (Gajendra Singh Shekhawat) यांनी ट्विट केला आहे. या पोटोत पारंपरिक पोषाखातलं जोडपं विधींमध्ये गुंतलेलं दिसतं.
शेखावत त्यांनी नवदाम्पत्याला लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. ‘पी व्ही सिंधू (P V Sindhu) आणि वेंकट साई दत्ता (Venkata Sai Dutta) यांच्या लग्न समारंभाला उदयपूरमध्ये हजर होतो. नवदाम्पत्याला नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या,’ असं शेखावत त्यांनी म्हटलं आहे.
(हेही वाचा – Jalna Bus Accident: एसटी बसचा भीषण अपघात; स्टेअरिंगचा रॉड तुटून बस २० फूट खोल दरीत कोसळली)
Pleased to have attended the wedding ceremony of our Badminton Champion Olympian PV Sindhu with Venkatta Datta Sai in Udaipur last evening and conveyed my wishes & blessings to the couple for their new life ahead.@Pvsindhu1 pic.twitter.com/hjMwr5m76y
— Gajendra Singh Shekhawat (@gssjodhpur) December 23, 2024
(हेही वाचा – Bandra Fire: वांद्रे येथील निवासी इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल)
२० डिसेंबरपासून हा विवाह सोहळा सुरू झाला. आधी हळदी समारंभ, पेल्लीकुथुरू आणि मेहंदी अशा सोहळ्यांनंतर प्रत्यक्ष लग्न संस्कारही पार पडले आहेत. सिंधूचे वडील वेंकट रमण्णा यांनी सिंधूच्या लग्नाची बातमी प्रसार माध्यमांना दिली होती. ‘दोन्ही कुटुंबं एकमेकांना काही वर्षं ओळखत होती. एका महिन्यापूर्वीच लग्न ठरलं. सिंधूला (P V Sindhu) डिसेंबरचा एकच महिना मोकळा असल्यामुळे एका महिन्यापेक्षा कमी वेळेत लग्नाची तयारी करण्यात आली,’ असं रमण्णा यांनी तेव्हा सांगितलं होतं.
लग्न सोहळ्यानंतर नवीन वर्षापर्यंत सिंधूला ब्रेक आहे. आणि त्यानंतर ती स्पर्धांमध्ये सहभागी होईल. तिचा पती वेंकट साई दत्ता (Venkata Sai Dutta) हा तंत्रज्जान क्षेत्रातील असून हैद्राबादमधील पॉसिडेक्स टेक्नॉलॉजी कंपनीत तो कार्यकारी संचालक आहे. उदयपूरमध्ये झालेल्या लग्न विधीनंतर २४ डिसेंबरला हैद्राबाद इथं स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. लग्नाच्या पहिल्या फोटोत नवदाम्पत्य आनंदी दिसत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community