POP: गणेशोत्सव समन्वय समितीची महापालिकेला विचारणा; पीओपीला पर्याय काय?

175

गणेशोत्सवाला (Ganeshotsav) अजून अवकाश असला तरी पुढील वर्षी गणेशोत्सवामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसवरील (Plaster of Paris) बंदीची अधिक कठोर अंमलबजावणी होणार हे लक्षात घेऊन प्लास्टर ऑफ पॅरिससारखा परवडणारा, दीर्घकाळ टिकणारा पर्यावरणस्नेही पर्याय द्यावा, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने (Brihanmumbai Public Ganeshotsav Coordination Committee) केली आहे. त्यासाठी नुकतीच गणेश मंडळे, मूर्तिकार यांनी बृहन्मुंबई महापालिका – उपायुक्त आणि सार्वजनिक गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे (Prashant Sapkale) यांची भेट घेतली. (POP)

शाडूच्या मूर्ती तयार करण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या तुलनेत अधिक वेळ लागतो. येत्या गणेशोत्सवामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडूच्या मूर्तीचा वापर करायचा असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच, परवडणाऱ्या किंमतीमध्ये आणि मोठ्या प्रमाणात – शाडूची माती मिळायला हवी, यासंदर्भात सपकाळे यांच्याशी चर्चा झाल्याचे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले.

मुंबईमध्ये १० ते १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून दोन लाख घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना केली जाते. एवढ्या मोठ्या संख्येने प्लास्टर ऑफ पॅरिसला पर्याय देण्यासंदर्भात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मार्गदर्शन होणे अपेक्षित असल्याचे मुंबई महापालिकेला सांगण्यात आले.

(हेही वाचा – Jalna Bus Accident: एसटी बसचा भीषण अपघात; स्टेअरिंगचा रॉड तुटून बस २० फूट खोल दरीत कोसळली)

मुंबईतील गणेशोत्सवामध्ये २५ ते ३० फुटांहून उंच मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. शाडूच्या मूर्ती एवढ्या उंच घडवता येतील का, या मूर्तीची किंमत ही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तर्तीपेक्षा जास्त असते, यावर नियंत्रण कसे आणणार, असाही प्रश्न विचारण्यात आला. पर्यावरणस्नेही मूर्तीचा विचार करता उच्च न्यायालयाच्या (High Court) निर्देशांचे पालन करण्याची मंडळांची इच्छा असून या प्रश्नांची उत्तरे लवकर मिळाली तर प्रत्यक्ष गणेशोत्सवाच्या आधी यासंदर्भात निर्णय घेता येऊ शकेल, असेही समितीतर्फे सांगण्यात आले.

(हेही वाचा – Vinod Kambli प्रकृती अस्वास्थ्यामुळे ठाण्याच्या रुग्णालयात दाखल, कशी आहे त्याची प्रकृती?)

महापालिका प्रशासन सकारात्मक

सन २०२४ प्रमाणे २०२५ मध्ये देखील पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मूर्तीकारांनी शाडूच्या मूर्ती साकारण्यावर भर द्यावा. यासाठी महानगरपालिकेकडून मूर्तीकारांना जास्तीत-जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, तसेच, त्यांना गतवर्षीप्रमाणे यंदाही शाडू माती आणि जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रशांत सपकाळे यांनी यावेळी नमूद केले. या बैठकीमध्ये मूर्तीकारांकडून करण्यात आलेल्या सूचनांचा महापालिका प्रशासनाकडून सकारात्मक विचार करून सहकार्य केले जाईल, असेही आश्वासन त्यांनी दिले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.