Bangladesh Crisis : शेख हसीनांना परत पाठवण्याची बांगलादेशची भारताकडे मागणी

68
Bangladesh Crisis : शेख हसीनांना परत पाठवण्याची बांगलादेशची भारताकडे मागणी
Bangladesh Crisis : शेख हसीनांना परत पाठवण्याची बांगलादेशची भारताकडे मागणी

बांगलादेशातील निदर्शने व हिंसक आंदोलनानंतर माजी पंतप्रधान आणि अवामी लीगच्या (Awami League) प्रमुख शेख हसीना (Sheikh Hasina) यांना देश सोडावा लागला होता. देशातील हिंसाचारानंतर त्या देश सोडून पळाल्या होत्या व त्यांनी भारतात आश्रय घेतला होता. भारतात आश्रय घेतलेल्‍या बांगलादेशच्‍या पदच्युत पंतप्रधान पंतप्रधान शेख हसीना यांविरुद्ध कायदेशीर कारवाई होणार आहे. त्‍यामुळे भारताने त्‍यांना बांगलादेशकडे सोपवावे, अशी मागणी बांगला देशचे परराष्‍ट्र मंत्री तौहीद हुसेन यांनी माध्‍यमांशी बोलताना केली आहे. तसेच यासंदर्भात भारताशी पत्र व्‍यवहारही करण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी या वेळी सांगितले आहे. (Bangladesh Crisis)

(हेही वाचा – Jalna Bus Accident: एसटी बसचा भीषण अपघात; स्टेअरिंगचा रॉड तुटून बस २० फूट खोल दरीत कोसळली)

परराष्ट्र मंत्री तौहीद हुसेन (Tawheed Hussain) यांनी माध्‍यमांशी बोलताना सांगितले की, शेख हसीना यांना बांगलादेशकडे सुपूर्द करावे, अशी मागणी आम्ही भारत सरकारला संदेश पाठवून केली आहे. आम्ही शेख हसीना यांच्‍या प्रत्यार्पणाबाबत परराष्ट्र मंत्रालयाला पत्र पाठवले आहे. ही प्रक्रिया सध्या सुरू आहे. ढाका आणि नवी दिल्ली यांच्यात प्रत्यार्पण करार अस्तित्वात आहे. या करारानुसार हसीना यांना बांगलादेशात परत आणले जाऊ शकते. शेख हसीना यांचा भारतातील आश्रय आणि बांगलादेशमध्ये हिंदूंवर (Hindus in Bangladesh) होणारे अत्याचार यामुळे गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. त्यातच बांगलादेशकडून शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली जात आहे. त्यामुळे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, बांगलादेशच्या उच्चायुक्तालयाकडून आम्हाला प्रत्यार्पणासंदर्भात विनंती प्राप्त झाली आहे. पण आम्ही अद्याप याबाबत कोणतेही उत्तर दिलेले नाही.

शेख हसीना व त्यांच्या पक्षातील नेत्यांवर बांगलादेशमध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. ढाकास्थित आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने मानवता आणि नरसंहाराविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी हे वॉरंट जारी केले आहे. त्यांनी ऑगस्ट 2024 मध्ये भारतात आश्रय घेतला होता. विद्यार्थी व नागरिकांकडून करण्यात आलेल्या आंदोलनानंतर त्यांना 16 वर्षांची सत्ता सोडून देशातून पळून जावे लागले होते. बांगलादेशमधील हिंसाचार प्रकरणी हसीना आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांविरोधात गुन्हे आणि नरसंहाराच्या 60 हून अधिक तक्रारी दाखल आहेत. शेख हसीना यांच्यावर 225 खटले दाखल आहेत. यामुळे खुनाचे 194 गुन्हे, मानवतेविरुद्ध आणि नरसंहाराचे 16 गुन्हे, अपहरणाचे तीन गुन्हे, खुनाच्या प्रयत्नाचे 11 गुन्हे आणि बांगलादेश राष्ट्रवादीच्या रॅलीवरील हल्ल्याचा एक खटल्‍याचा समावेश आहे. (Bangladesh Crisis)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.