Boxing Day Test : मेलबर्नची कसोटीतील खेळपट्टी कशी असेल? क्युरेटरने काय सांगितलं?

मालिकेत १-१ अशी बरोबरी असताना मेलबर्न कसोटीचं महत्त्व वाढलं आहे.

42
Boxing Day Test : मेलबर्नची कसोटीतील खेळपट्टी कशी असेल? क्युरेटरने काय सांगितलं?
Boxing Day Test : मेलबर्नची कसोटीतील खेळपट्टी कशी असेल? क्युरेटरने काय सांगितलं?
  • ऋजुता लुकतुके

बोर्डर-गावस्कर मालिकेत (Border-Gavaskar series) आता सगळ्यांचं लक्ष बॉक्सिंग डे कसोटीकडे (Boxing Day Test) लागलं आहे. पहिल्या पर्थ कसोटीत भारतीय संघाने २९५ धावांनी विजय मिळवला. पण, त्यानंतरची ॲडलेड दिवस-रात्र कसोटी भारताने १० गडी राखून गमावलीही. तर ब्रिस्बेन कसोटी पावसात वाहून गेली. त्यामुळे मालिकेत सध्या १-१ अशी बरोबरी आहे. त्यामुळे या कसोटीचं महत्त्व वाढलं आहे. पर्थ कसोटीत खेळपट्टीवर वेग आणि उसळी दोन्ही होतं. तर ॲडलेडमध्ये संध्याकाळी प्रकाशझोतात चेंडूला मिळणारा स्विंग निर्णायक ठरला. पुन्हा ब्रिस्बेनमध्ये खेळपट्टीवर अनियमित उसळी होती. आता मेलबर्नमध्ये फलंदाजांसाठी काय वाढून ठेवलंय, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

भारतीय संघाने सराव केला तेव्हा विराट कोहली (Virat Kohli) बॅटच्या तळाला टेप बांधून खेळताना दिसला. अर्थ सोपा आहे, चेंडू खाली राहत होता. एमसीजीचे क्युरेटर मॅट पेज यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. ‘मागच्या दोन वर्षांत इथं झालेले सगळे कसोटी सामने रंगतदार ठरले. त्यामुळे आम्हाला तयारीत काही बदल करण्याची गरज वाटत नाही. जे आहे तेच आम्ही सुरू ठेवणार आहोत. बॅट आणि चेंडू यांच्यातील द्वंद्व बघायला मिळेल एवढं नक्की,’ असं पेज शेवटी म्हणाले.

(हेही वाचा – Bangladesh Crisis : शेख हसीनांना परत पाठवण्याची बांगलादेशची भारताकडे मागणी)

खेळपट्टी फिरकीला साथ देईल का? त्यावर पेज म्हणतात, ‘फिरकीपटू? खेळपट्टीला फार भेगा पडत नाहीत. त्यामुळे फिरकीला साथ मिळण्याची शक्यता कमीच आहे. पाच दिवस चालेल अशी लढत बघायला मिळेल अशी आम्ही तयारी केली आहे. आणि त्यात वेगवेगळ्या वेळी गोलंदाजांना साथ मिळेल. फिरकीपटूंना आपलं कौशल्य सिद्ध करावं लागेल आणि फलंदाजांनी नेटाने फलंदाजी केली तर ते ही चांगली कामगिरी निश्चित करू शकतील.’

मेलबर्नमधील हवामान सध्या तरी उष्ण आणि दमट आहे. पण, ते चटकन बदलू शकतं. नाताळच्या सुमारास दिवसभरातील उच्चांकी तापमान अगदी ४० अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतं. तसंच सकाळी आणि संध्याकाळी ते २० अंश सेल्सिअसवरही जाऊ शकतं. पण, तापमान वाढलं तर चेंडूला गती जास्त मिळेल, असा अंदाज आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.