Waqf बोर्डाकडून मोठ्या प्रमाणावर हिंदूंनींची मंदिरे आणि जमिनींवर दावे ठोकत आहे. त्यामुळे Waqf विषयी प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. आता तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध आदिशक्ती सप्तशृंगी देवीच्या गडावर Waqf ने दावा ठोकला आहे, अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी केला आहे.
नाशिकच्या श्री क्षेत्र चिराई येथे आयोजित फिरता नारळी कार्यक्रमात बोलताना मंत्री राणे म्हणाले, वक्फ (Waqf) बोर्डाच्या लोकांनी अचानक तुमच्या जमिनीवर बोर्ड लावले तर तुमच्या हक्काची जमीन त्यंच्याकडून परत मागण्याचा अधिकार तुम्हाला नाही. त्यामुळे आपण जागरूक होऊन वावरलो नाही तर उद्या आपल्याला हे लोक घरातील पूजाअर्चाही करू देणार नाहीत, असेही मंत्री नितेश राणे म्हणाले.
मंत्री नितेश राणे म्हणाले, आज आपल्यापुढे वक्फ (Waqf) व लव्ह जिहादसारखी अनेक आव्हाने आहेत. एकीकडे हिंदू धर्मामध्ये सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याचे शिकवले जाते. तर दसरीकडे हिंदंची लोकसंख्या कमी करण्याचे मोठे कट कारस्थान रचले जात आहे. वक्फच्या लोकांनी आदिशक्ती सप्तश्रृंगी देवीच्या वणी गडावरही दावा ठोकला आहे. 56 मुस्लीम देशांपैकी एकाही देशात वक्फसारखा कायदा नाही. हा कायदा केवळ हिंदुराष्ट्र असणाऱ्या आपल्या भारतातच अस्तित्वात आहे.
Join Our WhatsApp Community