PM Awas Yojana : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महाराष्ट्राला २० लाख घरे मिळणार

79
PM Awas Yojana : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महाराष्ट्राला २० लाख घरे मिळणार

केंद्र सरकारने महाराष्ट्रातील जनतेला नवीन वर्षाची प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मोठी भेट दिली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महाराष्ट्रासाठी तब्बल २० लाख नवीन घरे मंजूर करण्याची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली असून त्यात याविषयीची माहिती दिली आहे. (PM Awas Yojana)

(हेही वाचा – Sambhal Excavation : संभलमधील हरि मंदिराभोवती आहेत ६८ तीर्थ; प्राचीन ग्रंथातील वर्णनानुसार शोध सुरु)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना लिहिले की, ‘प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी 20 लाख नवीन घरांना मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार.’ केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यासंदर्भात एक पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, मला तुम्हाला कळविण्यात आनंद होत आहे की, भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने तुमच्या राज्यासाठी 2024-25 या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 13,29,678 घरांचे अतिरिक्त लक्ष्य मंजूर केले आहे. देशातील ग्रामीण भागात सर्वांसाठी घरे उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारच्या वचनबद्धतेच्या दिशेने हे एक पाऊल आहे. तुमच्या राज्यासाठी आर्थिक वर्ष 2024-25 साठी एकत्रित लक्ष्य 19,66,767 घरांचे असेल. तुमच्या राज्यात पीएमएव्हाय-जी च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी या मंत्रालयाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यासाठी मी ही संधी घेऊ इच्छितो.” असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. (PM Awas Yojana)

(हेही वाचा – Amethi मध्ये सापडले १२० वर्ष जुने मंदिर; हिंदूंना पूजा-अर्चना करण्यास धर्मांधांची बंदी)

पुढे ते म्हणाले की, “या योजनेचा उद्देश पात्र ग्रामीण कुटुंबांना मूलभूत सुविधांसह पक्की घरे बांधण्यासाठी मदत करणे आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 9 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. ग्रामीण भागातील वाढत्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 2 कोटी अतिरिक्त घरे बांधण्यासाठी ही योजना आणखी पाच वर्षे मार्च 2029 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने अंतिम मंजूर अर्थसंकल्पातून 2024-25 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रासाठी 6,37,089 घरांची तरतूद केली आहे. (PM Awas Yojana)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.