…तर महाराष्ट्राचा बांगलादेश होईल; म्हणून मुसलमानांवर आर्थिक बहिष्कार टाका; Ranjit Savarkar यांचे आवाहन

हिंदूंनी कोणतीही वस्तू विकत घ्यायची असेल तर ती हिंदूंकडूनच घेईन असेच ठरवेल पाहिजे. मी फक्त हिंदू दुकानदाराकडूनच खरेदी करेन असा विचार करण्याचा कायद्याने आपल्याला अधिकार आहे. आपण हे न केल्यामुळे आजची परिस्थिती भयावह झाली आहे, असे रणजित सावरकर (Ranjit Savarkar) म्हणाले.

120

बांगलादेशी मुसलमान जास्त प्रमाणात महाराष्ट्रात येतात, कारण महाराष्ट्रात व्यवसायवृद्धी लवकर होते. म्हणून एखाद्या बांगलादेशी मुसलमानाला महाराष्ट्रात आणून कुठल्या तरी मशिदीत राहू दिले जाते आणि मौलाना त्याला कुठे तरी धंदा करायला जागा देतो. त्यामुळे हिंदूंनीच आर्थिक बहिष्कार टाकला पाहिजे. बाजारात उत्पादक आणि खरेदीदार दोघे हिंदू असतात पण मधले दलाल मुसलमान असतात. ते हिंदू उत्पादकाकडून कमी पैशात माल खरेदी करतात आणि महागात हिंदूंनाच विकतात. आता या मुसलमानांकडे प्रचंड पैसा आला आहे. या पैशाच्या आधारे ते धर्मांतर करतात, दहशतवादी कारवाया करतात, याला उपाय म्हणून ओम प्रमाणपत्र सुरु केले आहे. त्यात क्युअर कोड आहे. त्यात नोंदणी करणाऱ्या हिंदू दुकनदाराची सविस्तर माहिती उपलब्ध होणार आहे. हिंदूंनी नोकरीला ठेवतानाही हिंदूंनाच ठेवावे. याविषयीचे ओम प्रमाणपत्राचे ऍप देखील लवकर येणार आहे. आज जर आपण जागृत झालो नाही तर हिंदूंचे भविष्य भीषण असेल, जी परिस्थिती बंगाल आणि बांगलादेशात सुरु आहे, तीच आपल्याकडे होईल. आज विधानसभा निवडणुकीत १२० जागा फार कमी मताधिक्याने जिंकल्या आहेत. ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे, असेच जर सुरु राहिले तर पुढील ५ वर्षांनंतर पुन्हा हिंदुत्वाचे सरकार येईल, याची शाश्वती नाही, असा इशारा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी दिला.

हिंदूंच हिंदूंचे वैरी 

महाराष्ट्र मंदिर महासंघ, श्री जीवदानी देवी संस्थान, श्री साई पालखी निवारा, श्री ज्योतिर्लिंग भीमाशंकर देवस्थान आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी येथे तृतीय महराष्ट्र – मंदिर न्यास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, त्यावेळी ओम प्रतिष्ठानच्या वतीने राज्यभर सुरु झालेल्या ‘ओम प्रमाणपत्र’ चळवळीची माहिती देताना रणजित सावरकर बोलत होते. एकेकाळी मुंबईत सुतारकाम करणारे फक्त हिंदू होते, आज एकही सुतारकाम करणारा हिंदू दिसत नाही. मुंबईतील सर्व व्यवसाय मुसलमानांच्या ताब्यात गेले आहेत. फळभाज्यांच्या व्यवसायात ५-१० टक्के हिंदू वगळले तर उर्वरित सर्व व्यवसाय मुसलमानांनी ताब्यात घेतला आहे. हे मुसलमान बांगलादेशी आहेत. ते कमी पैशात कामे करतात, माल विकतात आणि मुसलमान २ पैसे कमी घेतो म्हणून हिंदू  मुसलमानांकडून वस्तू खरेदी करतात. पण त्याचे परिणाम वाईट झाले आहेत.आज ५ मिनिटात हजारोंच्या संख्येने हे मुसलमान रस्त्यावर उतरतात. या बांगलादेशींना बनावट आधार कार्ड दिले जाते, त्यांना आसरा दिला जातो. हे सर्व करण्यासाठी सरकारी यंत्रणेत बसलेले हिंदू त्यांना भ्रष्टाचाराद्वारे मदत करतात, असेही रणजित सावरकर (Ranjit Savarkar)  म्हणाले.

(हेही वाचा मुस्लिम महिला वकील उच्च न्यायालयात आली Hijab घालून; न्यायाधीशांनी कायदा सांगत युक्तीवादासाठी नाकारली परवानगी)

बहुतांश मंदिरे मुसलमानांनी वेढलेली 

जर तुम्हाला रामराज्य निर्माण करायचे असेल तर कृष्णनीतीचा अवलंब करावा लागेल, म्हणजे शत्रूंचा पूर्ण अभ्यास करावा लागेल आणि त्याला त्याच्याच शब्दांत उत्तर द्यावे लागेल, अधर्माने युद्ध करणाऱ्यांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर द्यावे लागले. आपण इतिहास अभ्यासाला, तर आपल्याला लक्षात येते की, परकीय आक्रमकांनी प्रथम आपल्या धर्मावर घाला घातला आहे. आज आपण अधिकाधिक भाविकांना मंदिरांमध्ये कसे आकर्षित करून घेता येईल, याचा विचार करत आहोत. ही परिस्थिती का उद्भवली? कारण आपण आपल्या मंदिरांकडे दुर्लक्ष करत आलो. हिंदूंसाठी मंदिरे आणि गायी श्रद्धास्थानी आहेत, हे परकीय आक्रमकांनी ओळखले होते, म्हणून त्यांनी आधी मंदिरे तोडली, हजारो गायीच्या कत्तली केल्या. तरीही आपल्या पराक्रमी राजांनी परकीयांनी मंदिरे पाडली तरी ती पुन्हा उभारली, पण परकीयांनी ती पुन्हा पाडली, आपण ती पुन्हा उभारली, असे सत्र सुरूच राहिले आणि शेवटी ‘रोज मरे त्याला कोण रडे’, अशी अवस्था झाली. परकीय आपल्याला ‘तुमचे देवच दुबळे आहेत, ते संरक्षण करू शकत नाहीत’, असे आपल्याला पटवून देऊ लागले. यात छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजा होते ज्यांनी पाच पादशाहांचा सामना करून स्वराज्य उभारले. पण पुन्हा ब्रिटिश आले आणि त्यांनीही आपल्यावर आक्रमण केले. आपणा लगेच गुलाम व्हायला तयार होतो, हा आपला दोष आहे, असेही रणजित सावरकर (Ranjit Savarkar) म्हणाले.

मंदिरे समाजाची केंद्रे बनली पाहिजे

आज डाव्यांकडून आपल्या धर्मावर आक्रमण सुरु आहे. या डाव्यांना मुसलमान आणि ख्रिश्चनांचा पाठिंबा असतो आणि ते हिंदूंना मात्र तुमचा हिंदू धर्म थोतांड आहे, असे म्हणतात. तसे ते मुसलमान किंवा ख्रिश्चनांना म्हणण्याची हिंमत करत नाहीत, जर त्यांनी तशी हिंमत केली तर ‘सर तन से जुदा’ होते. हे लोक या प्रकारची प्रखरता दाखवतात म्हणून त्यांना कुणी विरोध करत नाही, आपण तसा विरोध करत नाही, म्हणून आपली मंदिरे तोडली जातात, मंदिरे नुसती तोडली जात नाही तर त्यांची विटंबनाही केली जाते. खरेतर मंदिरे समाजाची केंद्रे बनली पाहिजे, पण आज आपली बहुतांश मंदिरे ही मुसलमानांनी वेढलेली आहेत. या मंदिरांच्या बाहेर पूजा साहित्य आणि प्रसाद विकणारी अधिकाधिक मुसलमानांची दुकाने आहेत. त्यामुळे आता जबाबदारी हिंदूंची आहे. हिंदूंनी कोणतीही वस्तू विकत घ्यायची असेल तर ती हिंदूंकडूनच घेईन असेच ठरवेल पाहिजे. मी फक्त हिंदू दुकानदाराकडूनच खरेदी करेन असा विचार करण्याचा कायद्याने आपल्याला अधिकार आहे. तुम्ही हिंदूंकडूनच खरेदी करा, असे म्हणू शकता. आपण हे न केल्यामुळे आजची परिस्थिती भयावह झाली आहे, असेही रणजित सावरकर (Ranjit Savarkar) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.