- प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारली. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार देखील झाला. मात्र आता ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी (Guardian Minister Post) महायुतीतील भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्ह्याचे पालकमंत्री करावे अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे तर १३ वर्ष पालकमंत्रीपद भूषविणारे तथा नवनिर्वाचित वनमंत्री गणेश नाईक यांना देण्यासाठी भाजपा समर्थक आग्रही आहेत. त्यामुळे या मातबगार नेत्यांमध्ये सुरु असणाऱ्या चढाओढीत कोण बाजी मारणार ? जिल्ह्याचे पालकत्व नाईक की शिंदे घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पालकमंत्री पदावरून महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे, गणेश नाईक आणि प्रताप सरनाईक यांना मंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात कोणाला पालकमंत्री पद मिळेल यावरून चर्चा रंगल्या आहेत.
(हेही वाचा – Republic Day 2025 : प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथावरून राजकारण)
ठाणे जिल्ह्यात भाजपाचा वरचष्मा
विधानसभा निवडणुकीत भाजपाने ठाणे जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारली. ठाणे जिल्ह्यात भाजपाचा १०० टक्के स्ट्राईक रेट दिसला. शिवसेनेने पण जोर लावत कमाल दाखवली. ठाणे जिल्ह्यातील ९ पैकी ९ जागा भाजपाने खिशात घातल्या. तर शिवसेनेला ७ पैकी ६ जागांवर विजय मिळवता आला. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो. पण स्ट्राईक रेटनुसार भाजपा येथेही मोठा भाऊ असल्याचा दावा करत आहे. तीन जागा अधिक निवडून आल्याने भाजपाने पालकमंत्री पदासाठी दावा ठोकल्याची चर्चा आहे. आमदार नाईक नवी मुंबईत आल्यानंतर मंत्रीपदी निवड झाल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत करीत शक्तीप्रदर्शन केले आहे.
दरम्यान भाजपा आणि शिवसेनेच्या पदाधिकारी, वरिष्ठ नेत्यांकडून नाईक व शिंदे यांनाच पालकमंत्री मिळेल, अशा चर्चा सोशल मिडीयावर रंगल्या आहेत. पालकमंत्री (Guardian Minister Post) म्हणून कुणाची आणि कधी निवड होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
(हेही वाचा – …तर महाराष्ट्राचा बांगलादेश होईल; म्हणून मुसलमानांवर आर्थिक बहिष्कार टाका; Ranjit Savarkar यांचे आवाहन)
संदीप नाईकांच्या फुटीवर चर्चा
विधानसभा निवडणुक तोंडावर असताना बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपामध्ये फुट पडली होती. गणेश नाईक यांचे पुत्र भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी कमळ सोडत तुतारी हाती घेतली. निवडणुकीत अवघ्या ३७७ मतांनी प्रतिस्पर्धी भाजपाच्या मंदा म्हात्रे या तिसऱ्यांदा विजयी झाल्या. ऐन निवडणुकीत नाईकांची ही खेळी पाडापाडीसाठी होती का ? अशी चर्चा सुरु आहे. संदीप नाईकांची ही खेळी भाजपा विसरुन पुन्हा पक्षात प्रवेश देणार की ? गणेश नाईकांना पुत्र कारस्थान पालकमंत्री पदापासून (Guardian Minister Post) दूर लोटणार ? असे देखील राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community