- सचिन धानजी, मुंबई
महापलिका प्रशासनाने उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून विचार करत वापरात नसलेले आपले छत्रपती शिवाजी महाराज मंडईच्या जागेसह वरळीतील अस्फाल्ट प्लांट अणि मलबार हिल येथील बेस्टचे रिसिव्हींग स्टेशनच्या जागा भाडे तत्वावर देण्यासाठी जाहिरात प्रदर्शित करून विविध विकासक, संस्था यांच्याकडून स्वारस्य अर्ज मागवले होते. परंतु, ऑक्टोबर महिन्यात मागवलेल्या या अर्जाची मुदत मागील १६ डिसेंबर २०२५ रोजी संपुष्टात आली आहे. परंतु या कालावधीत एकही अर्ज न आल्याने अखेर ही निविदा प्रक्रियाच महापालिकेच्या मालमत्ता विभागाने गुंडाळून टाकली आहे. (BMC)
(हेही वाचा – Award : यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचे आवाहन)
मुंबई महापालिका प्रशासनाने आता उत्पन्न वाढीचा विचार करत काही विनावापर असलेल्या आणि भविष्यात ज्या जागांची महापालिकेला गरज नाही असे भूखंड भाडेकरार पट्ट्यावर देऊन त्यातून महसूल वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तीन भूखंड लिलाव पद्धतीने भाडेकरारावर देण्यासाठी मागील ४ ऑक्टोबर २०२५ रोजी स्वारस्य अभिरुची अर्ज मागवण्या आलेले आहे. यामध्ये ए विभागातील छत्रपती शिवाजी महाराज मंडईच्या जागेचा समावेश आहे. येथील मंडई पाडण्यात आली असून यातील मच्छिमार गाळेधारकांना क्रॉफर्ड मार्केंटमधील जागेमध्ये कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात येणार आहे. या जागेवर मंडई आणि महापालिका कार्यालय असे आरक्षण आहे. परंतु ही जागा भाडेकरारावर दिल्यानंतर यावरील आरक्षण पूर्णपणे काढून ही जागा भाडेकरारावर देऊन त्याचा वापर निवासी किंवा वाणिज्य वापरासाठी बांधकाम करता येईल अशाप्रकारच्या अटीचा समावेश होता. (BMC)
(हेही वाचा – PM Awas Yojana : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महाराष्ट्राला २० लाख घरे मिळणार)
तर सध्या मुंबईतील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात येत असल्याने रस्त्यांच्या बांधकामासाठी डांबराचा वापर कमी होत आहे. त्यामुळे महापालिकेचा अस्पाल्ट प्लांटच्या जागेचा वापर कमी होणार आहे. त्यामुळे या जागेचा काही भाग हा भाडेकरारवर देऊन उर्वरित भाग लॅब करता ठेवणे असं निश्चित करण्यात आले. तर मलबार हिल येथील एका जागेवर बेस्ट रिसीविंग स्टेशन आहे. या रिसिव्हिंग स्टेशनच्या आकार कमी करून यातील काही भाग भाडेकरारवर देण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. हे तिन्ही भूखंड सध्या विना वापर पडून असल्याने महापालिकेने हे भूखंड भाडेकरारावर देऊन यातून महापालिकेला अधिकाधिक महसूल प्राप्त करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी मागवलेल्या स्वारस्य अभिरुची अर्जाद्वारे महापालिकेला या भूखंडातून किती निधी प्राप्त होऊ शकतो, याचा अंदाज येईल. आणि त्यानुसार महापालिका त्या भूखंडासंदर्भात रक्कम निश्चित करून लिलावाची रक्कम ठरवली जाईल, असा विचार होता. पण प्रत्यक्षात यासाठी मागवलेल्या स्वारस्य अर्जाला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर भूखंडाचा लिलाव करण्याचा निर्णयच रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. (BMC)
(हेही वाचा – Republic Day 2025 : प्रजासत्ताक दिनावरूनही अरविंद केजरीवालांकडून राजकारण)
भाडेकरारावर या जागांचा होणार होता लिलाव
महापालिका डी विभागातील बेस्ट रिसिव्हींग स्टेशन, सीएस क्रमांक ४३९ (अंशत 🙂
जागेचे क्षेत्रफळ : सुमारे २४०० चौरस मीटर
वरळी अस्फाल्ट प्लांट, सीएस क्रमांक १६२९ (अंशत 🙂
जागेचे क्षेत्रफळ : निश्चित करण्यात आलेले नाही
महापालिका ए वॉर्ड, छत्रपती शिवाजी महाराज मंडई, सीएस क्रमांक १५००
जागेचे क्षेत्रफळ : ८६०० चौरस मीटर
हेही पहा –
Join Our WhatsApp Community