छगन भुजबळ BJP कडून राज्यसभेवर?

163
छगन भुजबळ BJP कडून राज्यसभेवर?
  • खास प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मंत्रीपदापासून दूर ठेवल्याने प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे भुजबळ राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत असून भाजपाकडून त्यांना राज्यसभेवर पाठवत राष्ट्रीय पातळीवर ओबीसी चेहेरा म्हणून ओळख निर्माण करण्याची संधी देण्यात येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (BJP)

मंत्रिपद नाकरल्याने अधिवेशनाला दांडी

७७ वर्षीय छगन भुजबळ यांना अजित पवार यांनी मंत्री पद न दिल्याने त्यांचा आत्मसन्मान दुखावला गेला आणि नागपूर अधिवेशनात एक दिवस हजेरी लावत दुसऱ्याच दिवशी अधिवेशन सोडून थेट नाशिक गाठले. नागपूर सोडण्यापूर्वी भुजबळ यांनी अजित पवार यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली. ‘जहाँ नहीं चैना, वहा नहीं रहना,’ असे सूचक विधान भुजबळ यांनी केले. शनिवारी अधिवेशन संपल्यानंतर सोमवारी २३ डिसेंबर २०२४ या दिवशी भुजबळ यांनी अजित पवार यांची भेट न घेता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि भाजपाच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट संकेत दिले. (BJP)

(हेही वाचा – Guardian Minister Post : नवी मुंबई की ठाण्याचा सुभेदार होणार पालकमंत्री ?)

मंत्रीपदाचा संबंध समाजाशी

फडणवीस भेटीनंतर भुजबळ यांना पत्रकारांनी भाजपामध्ये जाणार का? असा थेट प्रश्न विचारला मात्र त्यांनी नकार दिला नाही. याचा अर्थ भुजबळ यांनी अजित पवार यांची साथ सोडण्याची मानसिक तयारी केल्याचे त्यांच्या देहबोलीवरून दिसत होती. तसेच भुजबळ माहिती दिली की फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी १०-१२ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. भुजबळ यांनी स्वतःला मंत्रीपद मिळाले नाही याचा संबंध ओबीसी समाजाशी जोडला आणि संपूर्ण ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचे चित्र दाखवले. वास्तविक फडणवीस सरकारमध्ये, भुजबळ अपवाद वगळता, ओबीसी समाजाला चांगले प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. (BJP)

दिल्लीहून ‘ओके’ झाल्यावर प्रवेश

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भुजबळ यांनी भाजपात प्रवेश करण्याबाबत फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून त्याबाबत फडणवीस यांनी ‘दिल्ली’शी बोलणार असल्याचे आश्वासन दिले आहे. भाजपा नेतृत्वाकडून ‘ओके’ आल्यावर भुजबळ यांचा भाजपात प्रवेश होईल आणि त्यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवून राष्ट्रीय पातळीवर ओबीसी नेतृत्व तयार करण्याचे नियोजन असल्याचे समजते. त्यामुळे काही दिवस विरंगुळयासाठी भुजबळ परदेशवारीवर जाणार असल्याचे कळते. (BJP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.