BMC : बेस्टला आतापर्यंत महापालिकेने केली ११,२३२ कोटी रुपयांची मदत

296
BMC : बेस्टला आतापर्यंत महापालिकेने केली ११,२३२ कोटी रुपयांची मदत
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मागील अनेक वर्षांपासून महानगरपालिकेकडून ‘बेस्ट’ उपक्रमाला सढळ हस्ते आर्थिक मदत केली जात असून मागील दहा वर्षात आजमितीस महानगरपालिकेने ‘बेस्‍ट’ उपक्रमास ११ हजार २३२ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची मदत करण्‍यात आली आहे. (BMC)

आर्थिक वर्ष सन २०१९-२० ते सन २०२३-२४ या पाच वर्षांच्‍या कालावधीत बृहन्‍मुंबई महानगरपालिकेमधून ‘बेस्‍ट’ उपक्रमास ८ हजार ५९४ कोटी २४ लाख रूपये इतका भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यमान आर्थिक वर्षामध्ये महानगरपालिकेने बेस्ट उपक्रमाला ८५० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्याव्यतिरिक्त ई-बस खरेदीसाठी आतापर्यंत ४९३ कोटी रूपये मिळवून देण्‍यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. महानगरपालिकेतर्फे बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान (दिवाळी बोनस) म्हणून या वर्षी ८० कोटी रूपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच, आगामी अर्थसंकल्‍पामध्‍येही भरीव तरतूद करण्‍याचे नियोजन चालू आहे. (BMC)

(हेही वाचा – Air Pollution नियंत्रण ही मुंबई महानगरातील सर्व यंत्रणांची सामुहिक जबाबदारी)

‘बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम’ (बेस्‍ट) ही भारतातल्या सगळ्यात मोठ्या नागरी परिवहन सेवांपैकी एक मानली जाते. मुंबईकर नागरिकांचा ‘बेस्‍ट’ उपक्रमाद्वारे होणारा प्रवास सुखकर, किफायतशीर आणि दर्जेदार व्‍हावा, यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिका या उपक्रमास नेहमीच मदत व सहकार्य करीत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महत्‍त्‍व आणि ही वाहतूक व्यवस्था चालविताना येणारी आव्हाने, या सगळ्याची बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास पूर्णपणे जाणीव आहे. (BMC)

बेस्‍ट उपक्रमाच्‍या कामगार संघटनांच्‍या प्रतिनिधींनी नुकतीच महानगरपालिका आयुक्‍तांची भेट घेतली व आपल्‍या विविध मागण्‍या महानगरपालिका प्रशासनाकडे मांडल्‍या. या भेटीदरम्‍यान महानगरपालिका आयुक्‍त आणि संबंधित प्रतिनिधी यांच्‍यात सुसंवाद झाला. तसेच, महानगरपालिका प्रशासन हे नेहमीप्रमाणेच ‘बेस्‍ट’ उपक्रमाच्‍या पाठिशी खंबीरपणे असल्‍याचा पुनरूच्‍चार करत महानगरपालिका आयुक्‍तांनी कर्मचाऱ्यांना आश्‍वस्‍त केले. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.