नामको बँकेच्या मालेगाव शाखेत झालेल्या हवालाकांडांसदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्वीट करून आणखी एक खळबळ जनक दावा केला आहे. देशभरातील ३०० वेगवेगळ्या बँकेतून आरटीजीएसच्या माध्यमातून तब्बल १००० कोटी रुपयांचा हवालाकांड करण्यात आल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी मेहमूद भगाड (Mehmood Bhagad) हा विदेशात पळून गेल्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.
(हेही वाचा : काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केलेला; CM Devendra Fadnavis यांचा हल्लाबोल)
विधानसभा निवडणूक काळात बारा बेरोजगार तरुणांच्या नावे सुमारे ११४ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यावेळी माजी खासदार सोमय्या (Kirit Somaiya) यांनी व्होट जिहादचा आरोप करीत मालेगाव येथील नामको बँक(Namco Bank), महाराष्ट्र बँक यांना भेट देऊन चौकशीची मागणी केली होती. सोमय्या यांनी दुसऱ्यांदा अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती व छावणी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना भेटून याप्रकरणी चौकशी करावी या मागणीचे गेल्या १४ डिसेंबर रोजी निवेदन दिले होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी एटीएसच्या (ATS) पथकाने मालेगावी चौकशी सत्र राबवले होते . मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान या प्रकरणाच सखोल चौकशी केली जाईल, असे सभागृहात स्पष्ट केले होते. आता किरीट सोमय्या यांनी तब्बल एक हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याच गंभीर आरोप केला.(Namco Bank)
मुंबईतील बैंक ऑफ बडोदा, इंडसन बैंक, कैनरा बैंक अशा एकूण सहा बँकांमधून आरटीजीएसद्वारे सिराज मोहम्मद यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर झाल्याचे त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मेहमूद भगाड हा देशाबाहेर फरार झाला आहे. याप्रकरणी २७ जणांवर गुन्हा दाखल असून सिराज अहमदसह अन्य चार जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. यात नामको बँकेच्या (Namco Bank) दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या आर्थिक घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणा ऍक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे. (Kirit Somaiya)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community