जम्मू आणि काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात मेंढरे भागात मंगळवार, 24 डिसेंबरल सायंकाळी लष्कराचे (Military) वाहन दरीत कोसळले. यात 5 जवानांचा मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच लष्कराचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि जखमी जवानांना रुग्णालयात दाखल केले.
या वाहनात 8 ते 10 जवान होते, त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला असून, उर्वरित जखमी जवानांवर उपचार सुरू आहेत. नीलम मुख्यालयाकडून बलनोई घोरा पोस्टकडे जाणारे 11 एमएलआयच्या लष्करी (Military) वाहनाचा घोरा पोस्टजवळ अपघात झाला. वाहन सुमारे 300-350 फूट खोल दरीत कोसळले. माहिती मिळताच 11 एमएलआयची क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी) घटनास्थळी पोहोचली आणि बचावकार्य सुरू केले. भारतीय लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन मृत जवानांबद्दल शोक व्यक्त केला.
गेल्या महिन्यातही अपघात झालागेल्या महिन्यात अशाच एका अपघातात जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात लष्कराचा (Military) एक जवान शहीद झाला होता, तर दुसरा जखमी झाला होता. 4 नोव्हेंबर रोजी कालाकोटच्या बडोग गावाजवळ हा अपघात झाला, ज्यामध्ये नाईक बद्री लाल आणि हवालदार जय प्रकाश गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान लाल यांचा मृत्यू झाला.
Join Our WhatsApp Community