Bangladeshi घुसखोरांना मदत करणारी टोळी जेरबंद; दिल्लीत ११ जणांना अटक

59
Bangladeshi घुसखोरांना मदत करणारी टोळी जेरबंद; दिल्लीत ११ जणांना अटक
Bangladeshi घुसखोरांना मदत करणारी टोळी जेरबंद; दिल्लीत ११ जणांना अटक

बांगलादेशी घुसखोरांना (Bangladeshi infiltrators) दिल्लीत राहण्यासाठी बनावट ओळखपत्र आणि इतर कागदपत्रे बनवल्याप्रकरणी पोलिसांनी 11 जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांपैकी 5 बांगलादेशी आणि 6 जणस्थानिक आहेत. हे लोक मतदान कार्ड, आधार कार्ड यांसारख्या बनावट कागदपत्रांद्वारे बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांना दिल्लीत राहण्यास मदत करायचे, असे पोलिसांनी सांगितले. (Bangladeshi)

( हेही वाचा : MPSC च्या परीक्षेसाठी वयोमर्यादेत आणली शिथिलता

दक्षिण दिल्लीचे पोलिस उपायुक्त अंकित चौहान (Ankit Chauhan) म्हणाले की, अटक केलेल्यांकडून बनावट आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. हे लोक बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून बनावट कागदपत्रे तयार करायचे. संकेतस्थळ रजत मिश्रा चालवत होता. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे, जिने बनावट आधार वापरून मतदार कार्ड बनवले होते. अवैध स्थलांतरितांनी भारतीय हद्दीत प्रवेश करण्यासाठी जंगल मार्ग आणि एक्स्प्रेस गाड्यांचा वापर केला असल्याचा अंदाज चौहान यांनी व्यक्त केला.(Bangladeshi)

दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना (V. K. Saxena) यांनी मुख्य सचिव आणि पोलिस आयुक्तांना बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी स्थलांतरितांची ओळख पटवण्यासाठी आणि कठोर कारवाई करण्यासाठी दोन महिन्यांची विशेष मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार 11 डिसेंबरपासून ही मोहीम राबवली जात असून पोलीस कारवाईमध्ये घरोघरी जाऊन पडताळणी, कागदपत्रांची तपासणी आणि चौकशी केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत शहरात 1 हजारहून अधिक अवैध बांगलादेशी स्थलांतरितांची ओळख पटली आहे.(Bangladeshi) (Bangladeshi infiltrators)

दिल्ली महानगरपालिकेने (एमसीडी) बेकायदेशीर बांगलादेशींच्या संदर्भात 21 डिसेंबर रोजी शिक्षण आणि आरोग्य विभागाला नोटीस पाठवली होती. शिक्षण विभागाला बेकायदेशीर बांगलादेशी विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांना पालिका शाळांमध्ये प्रवेश घेण्यापासून रोखण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश दिले होते. आरोग्य विभागाला पाठवलेल्या नोटीसमध्ये बेकायदेशीर बांगलादेशींचे जन्म प्रमाणपत्र बनवू नये असे आदेश देण्यात आले आहेत. ज्या बांगलादेशींची जन्म प्रमाणपत्रे आधीच जारी केली गेली आहेत, त्यांची ओळख पटवण्यासाठीही पडताळणी मोहीम राबवावी, असे एमसीडीने सांगितले आहे. बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांचे अतिक्रमण तातडीने हटवण्याचे आदेशही एमसीडीने दिले आहेत.(Bangladeshi)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.