राज्यात महायुतीचे सरकार स्थापनेनंतर आता मंत्र्यांचे खातेवाटप पूर्ण झाले आहे. नव्या मंत्र्यांनी आपापल्या विभागाची सूत्रे स्वीकारताच प्रशासकीय फेरबदलांना सुरुवात झाली आहे. त्यानंतर आज, मंगळवारी राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबईपासून ते गडचिरोलीपर्यंत अनेक अधिकाऱ्यांचा खांदेपालट करण्यात आला आहे. (IAS Transfer )
( हेही वाचा : करचोरी, करगळती रोखून कर्तव्यात हयगय न करता रिझल्ट ओरियंटेड काम करा; DCM Ajit Pawar यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश)
मुंबईतील बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर (Anil Diggikar) यांची बदली ही दिव्यांग विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी करण्यात आली आहे. तर हर्षदीप कांबळे यांची बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी बदली करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव राधाकृष्णन यांची महाजेनकोच्या अध्यक्षपदी बदली करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेंची नाशिक महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. महाजेनकोचे अध्यक्ष अनबाल्गन यांच्याकडे आता उद्योग विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी.
गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांकडे नागपूर टेक्सटाईल आयुक्तपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.आयुक्त अविशांत पांडा यांची गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.राज्य कर सहआयुक्त सी वनमाथी यांना वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. तर सा. वनमाथी यांच्या जागी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सीईओ संजय पवार यांची वर्णी लागली आहे. तसेच विवेक जोन्सन हे चंद्रपूरचे नवे जिल्हा परिषद सीईओ असतील.पुणे विभागीय महसूल उपायुक्त अण्णासाहेब चव्हाण यांची महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या सीईओपदी बदली करण्यात आली असून गोपीचंद कदम यांना सोलापूर स्मार्ट सिटी सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (IAS Transfer )
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community