-
ऋजुता लुकतुके
क्रिकेटच्या प्रसारासाठी दरवर्षी एखादी तरी आयसीसी आयोजित स्पर्धा असावी असा क्रिकेटमधील सर्वोच्च संघटनेचा विचार होता. आणि कसोटी क्रिकेट न खेळणाऱ्या देशांपर्यंत क्रिकेट पोहोचवण्याचा त्यांचा मानस होता. ही स्पर्धा बाद पद्धतीने खेळवली जाणार हे पक्कं होतं. त्यातूनच १९९८ साली एकदिवसीय विश्वचषका व्यतिरिक्त एक एकदिवसीय स्पर्धा भरवण्याचा घाट त्यांनी घातला. तेव्हा बांगलादेशला कसोटी दर्जा मिळालेला नव्हता. तिथे पहिली चॅम्पियन्स करंडक स्पर्धा पार पडली. आयसीसीचे पूर्ण सदस्य असलेले ९ देश यात सहभागी झाले. दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडिजला हरवत पहिली वहिली स्पर्धा जिंकली. (ICC Champions Trophy 2025)
पुढची स्पर्धा २००० मध्ये केनियात झाली. तेव्हा केनिया एकदिवसीय क्रिकेटमध्ये नुकता कुठे रुळू लागला होता. आयसीसीचे पूर्ण सदस्य असलेले ९ संघ आणि दोन असोसिएट सदस्य या स्पर्धेत सहभागी झाले. केनिया आणि बांगलादेश हे दोन असोसिएट संघ होते. न्यूझीलंडने अंतिम स्पर्धेत भारताला हरवत ही स्पर्धा जिंकली. (ICC Champions Trophy 2025)
(हेही वाचा- JNPT to Gateway of India Ferry प्रवासासाठी आता स्पीडबोटचा पर्याय; जुन्या लाकडी बोटींना अलविदा)
ही स्पर्धा शेवटची बाद पद्धतीने खेळवली गेलेली चॅम्पियन्स करंडक स्पर्धा होती. २००२ साली स्पर्धेचं स्वरुप बदलून साखळी पद्धत अंगीकारण्यात आली. यावेळी स्पर्धेचं नावही बदललं – चॅम्पियन्स करंडक. सुरुवातीला ही स्पर्धा भारतात होणार होती. पण, भारत सरकारने करांत सूट देण्यास नकार दिल्यामुळे स्पर्धा श्रीलंकेत हलवण्यात आली. यावेळी आयसीसीचा कसोटी दर्जा मिळालेले १० देश आणि बांगलादेश, नेदरलँड्स हे दोन असोसिएट सदस्य यात सहभागी झाले. १२ संघांची विभागणी ४ गटांमध्ये करण्यात आली. आणि साखळी सामन्यांनंतर बाद फेरीचे सामने झाले. अंतिम फेरीत पाऊस पडल्यामुळे विजेतेपद श्रीलंका आणि भारताला विभागून देण्यात आलं. (ICC Champions Trophy 2025)
२००४ ची स्पर्धा इंग्लंडमध्ये झाली. यात १० सदस्य देश आणि तोपर्यंत एकदिवसीय सामन्यांसाठी स्पर्धात्मक दर्जा मिळालेला केनिया आणि युएस संघही स्पर्धेत सहभागी झाला. अंतिम फेरीत वेस्ट इंडिजने इंग्लंडचा पराभव करत ही स्पर्धा जिंकली. २००६ पासून चॅम्पियन्स करंडकाचा नियम पुन्हा एकदा बदलला. यावेळी भारतात ही स्पर्धा झाली. आणि नवीन नियमाप्रमाणे आयसीसीच्या सदस्य देशांपैकी क्रमवारीतील पहिले ६ देश आणि पात्रता स्पर्धेतून आलेले ४ देश यांच्यात ही स्पर्धा झाली. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा पराभव करत ही स्पर्धा जिंकली. (ICC Champions Trophy 2025)
(हेही वाचा- Ladki Bahin scheme : लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरूवात)
२००८ पासून चॅम्पियन्स करंडकाचे नियम पुन्हा बदलले. आयसीसी एकदिवसीय क्रमवारीतील अव्वल ८ संघ या स्पर्धेत खेळणार असं ठरलं. आधी हा सामना पाकिस्तानमध्ये होणार होता. पण, सुरक्षेच्या कारणास्तव स्पर्धा तिथून हलवून दक्षिण आफ्रिकेत हलवण्यात आली. २००९ मध्ये ही स्पर्धा झाली. आणि ८ संघ दोन गटांत विभागण्यात आले. दोन्ही संघातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचले. आणि अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली. (ICC Champions Trophy 2025)
२००९ पासून आतापर्यंत तोच फॉरमॅट वापरला जातोय. स्पर्धा मात्र आता २ वर्षांऐवजी ४ वर्षांनी होते. पुढच्या २०१३ च्या चॅम्पियन्स करंडकात भारताने यजमान इंग्लंडचा पराभव केला. भारताचं हे दुसरं चॅम्पियन्स करंडक विजेतेपद. २०१७ च्या स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा पराभव करून पहिल्यांदा ही स्पर्धा जिंकली. (ICC Champions Trophy 2025)
(हेही वाचा- Ayodhya Ram mandir उभारणीचा ५०० वर्षांचा संघर्ष लवकरच टीव्हीवर; ट्रस्ट बनवत आहे माहितीपट)
चॅम्पियन्स करंडकाचे आतापर्यंतचे विजेते पाहूया,
१९९८ – द आफ्रिका
२००० – न्यूझीलंड
२००२ – भारत/श्रीलंका (संयुक्त विजेते)
२००४ – वेस्ट इंडिज
२००६ – ऑस्ट्रेलिया
२००९ – ऑस्ट्रेलिया
२०१३ – भारत
२०१७ – पाकिस्तान
चॅम्पियन्स करंडक ही एकदिवसीय प्रकारात खेळवली जाते. म्हणजे सामन्यात दोन्ही संघ प्रत्येकी जास्तीत जास्त ५० षटकं खेळू शकतात. पाऊस किंवा इतर कारणांमुळे षटकं कमी होऊ शकतात. (ICC Champions Trophy 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community