Pakistan Air Strike : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक; १५ जण ठार

108
Pakistan Air Strike : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक; १५ जण ठार
Pakistan Air Strike : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक; १५ जण ठार

पाकिस्तानने (Pakistan Air Strike) अफगाणिस्तानात (Afghanistan) घुसून एअर स्ट्राइक केला आहे. पाकिस्तानने पक्तिका प्रांतातील बरमल जिल्ह्यात हा हवाई हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. या हवाई हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह 15 जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पाकिस्तानचा हा हल्ला 24 डिसेंबरच्या रात्री झाला, ज्यामध्ये सात गावांना लक्ष्य करण्यात आले. (Pakistan Air Strike)

हेही वाचा-Ladki Bahin scheme : लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरूवात

मीडिया रिपोर्ट्नुसार मंगळवारी रात्री लामनसह सात गावांना निशाणा बनवण्यात आलं. तिथे एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाला. स्थानिक सूत्रांनुसार पाकिस्तानने हल्ल्यासाठी फायटर जेट्सचा वापर केला. रिपोर्टमधून जे संकेत मिळतायत त्यानुसार, बरमलमध्ये मुर्ग बाजार गाव नष्ट झालं. हवाई हल्ल्यात अनेक नागरिक गंभीर जखमी झालेत. व्यापक विनाश झालाय. या हल्ल्याने दोन्ही देशातील तणाव आणखी वाढला आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अधिकृरित्या हवाई हल्ल्याची पृष्टी केलेली नाही. टारगेट केलेल्या लोकांमध्ये वजीरिस्तानातून आलेले शरणार्थी सुद्धा आहेत. (Pakistan Air Strike)

तालिबानच्या (Taliban) संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्याचा निषेध केला आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्यानंतर तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने चोख प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे. अफगाणिस्तानला आपली जमीन आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे तालिबानने एक निवेदन जारी केले आहे. पाकिस्तानी लढाऊ विमानांनी बॉम्बफेक केलेल्या भागात वझिरीस्तानच्या निर्वासितांचाही समावेश होता, असंही तालिबान संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे. (Pakistan Air Strike)

ते वजीरिस्तानी शरणार्थी
पाकिस्तानच्या कबायली भागातील सैन्य अभियानामुळे जे लोक विस्थापित झाले ते वजीरिस्तानी शरणार्थी आहेत. टीटीपी कमांडर आणि दहशतवादी अफगाणिस्तानात पळून गेले असं पाकिस्तानच म्हणणं आहे. तिथल्या सीमावर्ती भागात अफगाणिस्तान तालिबान त्यांचं संरक्षण करत असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. अफगाणिस्तान, तहरीक-ए-तालिबानच्या दहशतवाद्यांना आश्रय देत असल्यामुळे मागच्या काही काळापासून दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. (Pakistan Air Strike)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.