Boxing Day Test : मेलबर्नमध्ये भारतीय संघ दोन फिरकी गोलंदाज खेळवणार?

Boxing Day Test : सरावादरम्यान चेंडूला जास्त उसळी मिळत नव्हती 

56
Boxing Day Test : मेलबर्नमध्ये भारतीय संघ दोन फिरकी गोलंदाज खेळवणार?
Boxing Day Test : मेलबर्नमध्ये भारतीय संघ दोन फिरकी गोलंदाज खेळवणार?
  • ऋजुता लुकतुके

बोर्डर गावसकर मालिकेत आता चौथी कसोटी २६ डिसेंबरला होणार आहे. भारतीय संघ एमसीजीवर सराव करत असताना तीनही दिवस इथे चेंडू फारसा उसळी घेत नव्हता. शिवाय पारंपरिकरित्या हे मैदान दुसऱ्या डावात फिरकीला साथ देताना दिसतं. त्यामुळे भारतीय संघही मेलबर्न कसोटीत दोन फिरकीपटू घेऊन खेळण्याचा विचार करत आहे. मेलबर्नची खेळपट्टी दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसापासून संथ होते असा अनुभव आहे. (Boxing Day Test)

रोहित शर्माने कसोटी आधीच्या पत्रकार परिषदेत त्याविषयीचे संकेत दिले आहेत. ‘खेळपट्टीचं रुप बघून तिच्यावर खेळण्यासाठी जे काही आवश्यक असेल ते आम्ही करू. म्हणजे काय ते नेमकं आम्ही ठरवलेलं नाही. पण, खेळपट्टीची गरज बघून दुसरा फिरकीपटू खेळवण्याची शक्यता नाकारता येत नाही,’ असं रोहित शर्मा म्हणाला. (Boxing Day Test)

(हेही वाचा- ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकाची सुरुवात कशी झाली? आयसीसीच्या या स्पर्धेविषयी जाणून घ्या सर्व काही)

मेलबर्न मैदानाचा क्युरेटर मॅट पेज याने मात्र मंगळवारी बोलताना खेळपट्टी फिरकीला फारशी मदत करणार नसल्याचं म्हटलं होतं. मेलबर्नमध्ये कसोटीच्या दिवसांत ४० अंश सेल्सिअस पर्यंत तापमान वर जाऊ शकतं. असं असतानाही खेळपट्टी फिरकीला साथ देईल असं क्युरेटरला वाटत नाही. (Boxing Day Test)

पण, भारतीय संघ आधी वापरलेल्या खेळपट्ट्यांवर सध्या सराव करत आहे. आणि तिथे चेंडू चांगलेच खाली राहत आहेत. त्यामुळे भारतीय संघ फिरकीपटूची निवड करू शकतो. तसं झालं तर गौतम गंभीर आणि रोहितचीही पसंती ही जडेजाच्या खालोखाल वॉशिंग्टन सुंदरला असेल. अश्विन आता निवडीसाठी उपलब्ध नाही. आणि संघात तनुष कोटियनचा समावेश झाला असला तरी त्याला इतक्यात संधी मिळण्याची शक्यता नाही. (Boxing Day Test)

(हेही वाचा- Pakistan Air Strike : पाकिस्तानचा अफगाणिस्तावर एअर स्ट्राईक; १५ जण ठार)

या मालिकेत भारतीय तेज गोलंदाजांची कामगिरी म्हणावी तशी झालेली नाही. आणि भारतीय संघ एकट्या बुमराहवर अवलंबून आहे. पण, रोहितने कर्णधार म्हणून सिराज, हर्षित आणि आकाशदीपची पाठराखण केली आहे. त्यांच्यावर आपला विश्वास असून ते चांगली कामगिरी करतील असं रोहीतने म्हटलं. (Boxing Day Test)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.