-
ऋजुता लुकतुके
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला शनिवारी रात्री गंभीर अवस्थेत ठाण्याच्या आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या मेंदूत रक्ताच्या गाठी तयार झाल्याचं निदान झाल्यावर तातडीने उपचार सुरू असले तरी तिथल्या डॉक्टरांनी प्रकृतीतील सुधारणा काहीशी धिमी असल्याचं म्हटलं आहे. ५२ वर्षीय माजी क्रिकेटपटू सध्या तब्येतीच्या समस्यांशी झुंजतोय. शिवाजी पार्कवर उभारण्यात आलेल्या रमाकांत आचरेकर स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्यात तो लोकांसमोर आला तेव्हाही त्याची प्रकृती ढासळल्याचंच दिसलं होतं. (Vinod Kambli)
(हेही वाचा- Khel Ratna Snub : मनु भाकरने कबूल केली खेल रत्नासाठी अर्ज करतानाची चूक)
त्यानंतर शनिवारी त्याची प्रकृती अचानक ढासळली. आणि त्याला रुग्णालयात हलवण्यात आलं. रुग्णालयाचे अतीदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. विवेक द्विवेदी यांनी मंगळवारी प्रसार माध्यमांना विनोद कांबळीच्या प्रकृतीविषयी अपडेट दिला. ‘कांबळी यांना रुग्णालयात दाखल केलं तेव्हा त्यांचे स्नायू दुबळे झाले होते. त्यांना मूत्राशयात इन्फेक्शन झालं होतं. रक्तदाबही कमी झाला होता. स्कॅन केल्यानंतर त्यांच्या मेंदूत आधीपासून काही गाठी असल्याचं दिसलं. आधी त्यांना आलेल्या झटक्यानंतर त्या तयार झाल्या होत्या. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. पण, फारशी बरी नाही. मेंदूची स्थिती फारशी चांगली नाही. काही मूलभूत बदल डोक्यात झाले आहेत,’ असं द्विवेदी यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. (Vinod Kambli)
#WATCH | Thane, Maharashtra | On Former Indian Cricketer Vinod Kambli’s hospitalisation, the doctor treating him, Chief Intensivist of Aakriti Hospital, Dr Vivek Dwivedi says, “We admitted him on Saturday evening. He was experiencing muscle cramps and dizziness at home… He had… pic.twitter.com/RffhlY9idr
— ANI (@ANI) December 24, 2024
खुद्ध विनोद कांबळीनेही वृत्तसंस्थेला छोटी मुलाखत दिली आहे. आणि यात त्याने आपण खेळाडू असल्यामुळे दुखापतीशीही लढणार असल्याचं म्हटलं आहे. विनोद कांबळीला यापूर्वीही प्रकृतीच्या तक्रारी होत्या. आणि दोनदा त्याच्यावर ह्रदयविकाराची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तर त्याला मध्यंतरी त्याला मेंदूतील रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे मेंदूत झटकाही आला होता. (Vinod Kambli)
(हेही वाचा- Boxing Day Test : मेलबर्नमध्ये भारतीय संघ दोन फिरकी गोलंदाज खेळवणार?)
विनोद कांबळी भारतासाठी १७ कसोटी आणि १०६ एकदिवसीय सामने खेळला आहे. आणि यात त्याने ४,००० आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सलग दोन कसोटींत द्विशतक झळकावणारा तो पहिला क्रिकेटपटू आहे. (Vinod Kambli)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community