-
ऋजुता लुकतुके
महत्त्वाच्या बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी रोहित शर्माने त्याचा फलंदाजीचा क्रम आणि अंतिम अकरा जणांत कोणाला खेळवणार या महत्त्वाच्या प्रश्नांना हुशारीने बगल दिली. इतर मुद्यांवर मात्र तो दिलखुलासपणे बोलला. गुडघ्याला झालेली दुखापत अजिबातच गंबीर नाही, असं तो म्हणाला. आणि विराटच्या बाजूने ठामपणे उभा राहिला. (Boxing Day Test)
(हेही वाचा- Pakistan Air Strike : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक; १५ जण ठार)
रविवारी फलंदाजीचा सराव करताना बुमराहचा एक चेंडू रोहितच्या गुडघ्यावर बसला होता. त्यानंतर रोहितला मैदान सोडावं लागलं. आणि ती जागा सुजलेलीही दिसत होती. ‘माझा गुडघा एकदम बरा आहे,’ असं म्हणत रोहितने तो विषय संपवला. रविवारनंतर रोहितने इतरांबरोबर फलंदाजीचा सरावही केला आहे. पण, त्याने केलेला सराव हा वापरून जुन्या झालेल्या खेळपट्टीवर केलेला होता. म्हणजेच मेलबर्नमध्येही रोहित मधल्या फळीतच फलंदाजीला येणार का? (Boxing Day Test)
Rohit Sharma said – “It’s not the thing we should be discussing my batting position in the every press conference where I’ll be batting. Whatever the team needs and where the team succeed we will try to do that”. (Sandipan Banerjee). pic.twitter.com/j4j7AwV6Re
— Tanuj Singh (@ImTanujSingh) December 24, 2024
‘कोण कुठे फलंदाजी करणार याची काळजी नको करूया. आम्ही त्यावर योग्य तो निर्णय घेऊ. पण, इथे मी त्यावर चर्चा करणार नाही. जे संघासाठी योग्य असेल तेच आम्ही करू,’ असं म्हणत रोहितने हा विषयच संपवला. रोहित पहिली पर्थ कसोटी खेळला नव्हता. त्यावेळी के. एल. राहुल सलामीला आला. आणि यशस्वी जयसवालबरोबर २०१ धावांची सलामी देत त्याने आपली जागा जवळ जवळ पक्की केली आहे. आणि रोहित पुढच्या दोन कसोटींत सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. तिथे तो अपयशी ठरल्यामुळे त्याच्या क्रमांकाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. (Boxing Day Test)
(हेही वाचा- Boxing Day Test : मेलबर्नमध्ये भारतीय संघ दोन फिरकी गोलंदाज खेळवणार?)
विराटबद्दलही रोहित आश्वस्त होता. ‘तो आधुनिक काळातील दिग्गज खेळाडू आहे. तो आपली वाट स्वत: शोधून काढेल. त्याला आमचा पाठिंबा आहे,’ असं रोहित म्हणाला. विराटने या मालिकेत आतापर्यंत ३१ धावांच्या सरासरीने १२३ धावा केल्या आहेत. पर्थ कसोटीतील शतक सोडलं तर त्याच्या धावा आहेत ५, ७, ११ आणि ३. (Boxing Day Test)
विराटबरोबरच रोहित शर्माही फॉर्मशी झुंजतोय. आणि त्याने दोन कसोटींच्या ३ डावांत मिळून १९ धावा केल्या आहेत. पण, फॉर्मची काळजी न करता, अख्ख्या संघाचा विचार करणार असल्याचं रोहितने सांगितलं आहे. (Boxing Day Test)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community