Kalyan Minor Girl Murder Case : कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत

224
Kalyan Minor Girl Murder Case : कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत
Kalyan Minor Girl Murder Case : कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत

कल्याण (Kalyan Minor Girl Murder Case) नजीकच्या बापगाव परिसरामध्ये १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला होता. या मुलीवर लैंगिक अत्याचार (Kalyan Crime) करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दुकानामध्ये खाऊ आणण्यासाठी ही मुलगी गेली होती. तिचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणात मुख्य आरोपी फारार होता. पण आता मुख्य आरोपीला अटक झाली आहे. (Kalyan Minor Girl Murder Case)

हेही वाचा-TuljaBhavani Temple : … म्हणून 1 जानेवारीपर्यंत तुळजाभवानी मंदिर 22 तास राहणार दर्शनासाठी खुले

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळीला (Vishal Gawli) अखेर पोलिसांनी पकडलं आहे. कल्याण पोलिसांची सहा पथकं त्याच्या मागावर होती. शेगाव येथून पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतलं. विशाल गवळी पत्नीच्या गावी लपून बसला होता. (Kalyan Minor Girl Murder Case)

हेही वाचा-Ladki Bahin scheme : लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरूवात

मुलीला घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकाला पोलिसांनी आधीच अटक केली आहे. कल्याण पूर्वेत विनयभंगाचे पाच गुन्हे विशाल गवळीवर दाखल आहेत. त्याशिवाय बलात्कार, पॉक्सो सारख्या गुन्हयांमधील हा आरोपी तडीपार होता. (Kalyan Minor Girl Murder Case)

हेही वाचा-Pakistan Air Strike : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक; १५ जण ठार

अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे. राजकीय पक्ष आणि स्थानिक नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. बदलापूर घटनेच्या पार्शवभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त परिसरात आहे. नागरिकांच्या आंदोलनानंतर पोलीस सतर्क झाले आहेत. कल्याण कोळशेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. राजकीय पक्ष व स्थानिक नागरिकांच्या इशाऱ्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी आज पहाटेपासूनच कल्याण कोळसेवाडी परिसरात मोठा फौजफाटा तैनात केला आहे. (Kalyan Minor Girl Murder Case)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.