उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात होणाऱ्या महाकुंभ 2025 साठी सुरक्षा संस्था सतर्क झाल्या आहेत. ‘शीख फॉर जस्टिस’ या संघटनेचा प्रमुख असलेल्या खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannu) याने महाकुंभाला लक्ष्य करण्याची धमकी देणारा व्हिडिओ संदेश जारी केल्यानंतर सतर्कता वाढवण्यात आली.
खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या धमकीनंतर प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभविषयी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पोलीस अधिकारी अमिताभ यश यांनी त्याच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे. अमिताभ यश म्हणाले की, सर्व सुरक्षा संस्था कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीसाठी तयार आहेत. उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यात सोमवारी तीन खलिस्तानी दहशतवादी (Khalistani terrorist) विरेंद्र सिंग, गुरविंदर सिंग आणि जशनप्रीत सिंग यांच्या चकमकीनंतर पन्नूने अमेरिकेतून एक व्हिडिओ जारी केला. या व्हिडिओतून त्याने महाकुंभमध्ये (mahakumbh 2025) बदला घेण्याची धमकी दिली आहे.
(हेही वाचा – Kalyan Minor Girl Murder Case : कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत)
पन्नूने या या कुंभला हिंदूंचा शेवटचा महाकुंभ बनवण्याची आणि तीन शाही स्नानांना (14 जानेवारीला मकर संक्रांती, 29 जानेवारीला मौनी अमावस्या आणि 3 फेब्रुवारीला शेवटचा शाही स्नान) लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. पन्नूच्या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
सर्व भाविकांची सुरक्षा सुनिश्चित केली जाईल. महाकुंभासाठी सात स्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण मेळा परिसरात ड्रोन तैनात केले जातील. जे प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवतील. संवेदनशील भागात आणि प्रवेशद्वारांवर चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाने सुसज्ज कॅमेरे बसवण्यात आले आहेत. संभाव्य सायबर हल्ले रोखण्यासाठी एक विशेष सायबर युनिट काम करत आहे. एनएसजी आणि एटीएसची विशेष पथके तैनात केली जातील. पाणी, जमीन आणि हवाई सुरक्षेसाठी नद्यांमध्ये गस्त घालण्यासाठी विशेष नौका आणि हवाई दलाची हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली आहेत. परदेशी पर्यटकांसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, असे पोलीस सूत्रांनी याविषयी सांगितले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community