Pandit Madan Mohan Malviya यांच्या जयंतीनिमित्त हिंदू महासभेकडून अभिवादन

69
Pandit Madan Mohan Malviya यांच्या जयंतीनिमित्त हिंदू महासभेकडून अभिवादन
Pandit Madan Mohan Malviya यांच्या जयंतीनिमित्त हिंदू महासभेकडून अभिवादन

पंडित मदन मोहन मालवीय यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात हिंदू महासभेच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली. त्या वेळेस हिंदू महासभा महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष व मुंबई अध्यक्ष अनुप केणी, हिंदू महासभा मुंबईचे कार्यवाह ॲडव्होकेट प्रवीण गरजे, हिंदू महासभा महाराष्ट्र प्रदेशचे कोशाध्यक्ष हरीश शेलार, तसेच हिंदू महासभा गोवंडी येथील कार्यकर्ते संजय चिंचके, प्रमोद गावंड, अशोक केणी, शताब्दी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी  आदिनाथ आदिनाथ आंधळे आणि तेथील मुख्य परिचारिका रिना जोशी उपस्थित होत्या. (Pandit Madan Mohan Malviya)

(हेही वाचा – प्रयागराज येथील महाकुंभमेळा लक्ष्य करण्याची खलिस्तानी दहशतवादी Gurpatwant Singh Pannu ची धमकी)

या प्रसंगी रुग्णालयातील इतर कर्मचारी वर्ग देखील उपस्थित होते. सदर कार्यक्रमात दिला जोशी व अनुपजी केळी यांनी पंडित मदन मोहन मालवीय यांच्या कार्याची माहिती दिली. या कार्यक्रमात पंडित मदन मोहन मालवीय यांना पुष्पमाला अर्पण करून हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी व रुग्णांना पेढ्याचे वाटप करण्यात आले. या वेळी सर्वांनी पंडित मदन मोहन मालवीय यांना आदरांजली वाहिली.

पंडित मदनमोहन मालवीय यांच्या कार्याचा परिचय

२५ डिसेंबर १८६१ रोजी अलाहबाद (Allahabad, सध्याचे प्रयागराज) जन्मलेल्या मालवीय यांचे शिक्षण कोलकाता युनिव्हर्सिटीत झाले. पंडित मदनमोहन मालवीय यांच्या कष्टातून बनारस हिंदू युनिव्हर्सिटीसारखी दर्जेदार शिक्षणसंस्था उभा राहिली. मालवीय यांनी बीएचयू संस्थेच्या स्थापनेचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी बरीच मेहनत घेतली. त्यांनी या संस्थेच्या स्थापनेसाठी निजामाकडून मदत मागितली, तेव्हा त्याने मदत करण्यास नकार दिला. त्यामुळं बीएचयूसाठी निधी गोळा करण्यासाठी मालवीय यांनी बाजारात आपल्या चपलांचा लिलाव केला आणि ती चप्पल निजामाने सर्वाधिक बोली लावत खरेदी केली.

भाजपचे नेते मालवीय (Pandit Madan Mohan Malviya) यांना आदर्श मानत असले, तरी मुळात ते वल्लभभाई पटेल यांच्याप्रमाणेच राष्ट्रीय काँग्रेसमधील दिग्गज चेहऱ्यांपैकी एक होते. त्यांनी १९०९, १९१८, १९३२ आणि १९३३ मध्ये असे चार वेळा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले आहे. अलाहबाद उच्च न्यायालयात वकिली करत असताना त्यांनी गोरखपूरमधील चोरीच्या गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आलेल्या क्रांतिकारकांच्या बाजूने खटला लढला. त्यांनी १५३ क्रांतिकारकांना जन्मठेप होण्यापासून वाचवले.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.