कुणीही बीड आणि परभणीचे पर्यटन करू नये; CM Devendra Fadnavis यांचा विरोधकांना इशारा

159
कुणीही बीड आणि परभणीचे पर्यटन करू नये; CM Devendra Fadnavis यांचा विरोधकांना इशारा
कुणीही बीड आणि परभणीचे पर्यटन करू नये; CM Devendra Fadnavis यांचा विरोधकांना इशारा

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येमुळे राज्यभरातील वातावरण तापलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आज (२५ डिसेंबर) नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर प्रतिक्रिया दिली. बीड जिल्ह्यात कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला. तसेच कुणीही बीड आणि परभणीचे पर्यटन करू नये, असेही फडणवीस म्हणाले. (CM Devendra Fadnavis)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “परभणीमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे. एखाद्या घटनेचं गांभीर्य तिथे कोण गेला आहे, त्यापेक्षा आपण त्याला कसे रिस्पॉन्स करतो यावरून ठरते. प्रत्येकच ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जावे असे होत नाही. घटना महत्त्वाची होती म्हणूनच उपमुख्यमंत्री अजित पवार त्या ठिकाणी केले होते. कोणतीही घटना घडल्यावर विरोधी पक्ष आणि सत्तेतील मंत्र्यांनी तिकडे जावे. माझी हरकत नाही. पण तिथे जाऊन राजकारण करू नये. पर्यटन करू नये.” असे फडणवीस म्हणाले. (CM Devendra Fadnavis)

ही टेस्ट मॅच ड्रॉ होणारी नाही
पुढे बोलताना ते म्हणाले, “मी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आम्ही तिघेही सोबत काम करत आहोत. गेल्या अडीच वर्षांत आम्ही टी-20 ची मॅच खेळलो आणि तो विश्वचषक आम्ही जिंकलो. आता वनडे किंवा टी-20 खेळण्याची आवश्यकता नाही. आता हा टेस्ट मॅचचा फॉरमॅट आहे. ही टेस्ट मॅच ड्रॉ होणारी नाही, तर जिंकणारी असणार.” (CM Devendra Fadnavis)

फॉरवर्ड करणारे सहगुन्हेगार
सोशल मिडीयाच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, “एखादी गोष्ट चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावर टाकतो, तेव्हा त्याचे 100 टक्के डिजीटल फुटप्रिंट आम्हाला शोधता येतात. एकाने सोशल मीडियावर टाकले आणि 100 जणांनी त्याला फॉरवर्ड केले, तर ती 100 लोक कोण? हे देखील लगेच शोधून काढता येते. कारण सगळ्या प्रकारच्या फॉरवर्ड्सची माहिती व्हॉट्सअॅपला मागता येते. त्यांच्याकडून त्याची माहिती मिळते. या गुन्ह्यांमध्ये केवळ गुन्हा करणाराच नाही, तर अशा गोष्टी फॉरवर्ड करणारे सहगुन्हेगार होतात. त्यामुळे लोकांनी अशाप्रकारच्या गोष्टी फॉरवर्ड करू नये. पुढील काही काळ हे एक आव्हानच राहणार आहे. ते आव्हान पेलण्याचा आम्ही तयारी करत आहोत.” (CM Devendra Fadnavis)

काँग्रेसने ईव्हीएमवर आरोप करणे बंद करावे
ईव्हीएमच्या (EVM) मुद्द्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, “झोपलेल्याला जागे करता येते, झोपेचे सोंग घेणाऱ्याला जागे करता येत नाही. ईव्हीएममध्ये छेडछाड करता येत नाही. निवडणूक आयोगाने आव्हान देऊनही काँग्रेस (Congress) किंवा इतर कोणी काही करू शकले नाही. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ईव्हीएमवर खापर फोडायचे आणि जिंकल्यास लोकशाही जिंकली असे म्हणायचे, ही काँग्रेसची निती राहिली आहे. आता काँग्रेसला उत्तर देण्यासाठी माझी किंवा निवडणूक आयोगाला आवश्यकता नाही. कारण ओमर अब्दुल्ला आणि ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला उत्तर दिले आहे. काँग्रेसने ईव्हीएमवर आरोप करणे बंद करावे.” (CM Devendra Fadnavis)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.