Ration Card ग्राहकांसाठी खुशखबर; आता दुकानात धान्य आल्यानंतर मोबाइलवर येणार मेसेज

188
रेशन कार्ड (Ration Card) सर्व नागरिकांसाठी महत्त्वाचं कागद पत्र म्हणून ओळलखं जातं. तसेच नागरिकांना कमीत कमी रुपयांमध्ये धान्य मिळावे, जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात, तसेच सरकारी उपाययोजनांमध्ये सवलत मिळावी यासाठी रेशन कार्डचे वाटप करण्यात येते. याच रेशन कार्ड लाभार्थी कुटुंबियांसाठी सरकार तर्फे खुशखबर देण्यात आली आहे. अन्न धान्यांचा गैरमार्गाला चाप बसविण्यासाठी तसेच रेशन कार्ड लाभार्थीना जलद माहिती मिळण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने (Food and Civil Supplies Department) मोबाइलचा प्रभावीपणे वापर सुरू केला आहे. सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीच्या लाभार्थीना रेशन दुकानात (Ration grain shop) धान्य आले आहे का, याची माहिती त्यांना मोबाइलवर संदेश (Ration Card Message) द्वारे कळविण्यात येणार आहे. (Ration Card)

(हेही वाचा – प्रयागराज येथील महाकुंभमेळा लक्ष्य करण्याची खलिस्तानी दहशतवादी Gurpatwant Singh Pannu ची धमकी)

सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आह. पालघर जिल्ह्यात एकूण ४ लाख ३२ हजार ४१ लाभार्थी आहेत. त्यातील ९७,९५९ हे अंत्योदयाचे लाभार्थी आहेत. तर उरलेले ३ लाख लाभार्थी हे प्राधान्य कुटुंबातील आहे. आता नवीन नियमांनुसार तुम्हाला धान्य रेशन दुकानावर आल्यावर मोबाईलवर मेसेज येणार आहे. यासाठी तुम्हाला रेशन दुकानावर जाऊन आधार कार्ड आणि मोबाईल नंबरची नोंद करावी लागणार आहे.

धान्य आले ते कळणार कसे?
  • शासनाच्या एसएमएस गेटवे सिस्टमद्वारे लाभार्थीना मोबाइलवर मेसेज पाठवला जाणार आहे.
  • ई-पॉज मशीनवर लाभार्थीचा अंगठा घेतल्यानंतरच धान्य वितरण होते. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीने धान्य उचलण्याचा प्रश्नच येत नाही, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
    (हेही वाचा – Twitter Subscription Hike : भारतात ट्विटर वापराचं शुल्क ३५ टक्क्यांनी वाढलं)
नंबर अपडेटला पैसे लागतात का?
मोबाइल सिडिंग प्रक्रिया ही ई-पॉज मशीन, तसेच आरसीएमएस साइटद्वारे राबवली जाते. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.