Atal Bihari Vajpayee हे Jawaharlal Nehru यांचे भक्त; संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाजपाने व्यक्त केला संताप

127
Atal Bihari Vajpayee हे Jawaharlal Nehru यांचे भक्त; संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाजपाने व्यक्त केला संताप
  • खास प्रतिनिधी

शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांची तुलना जवाहरलाल नेहरू यांच्याशी केल्याने भाजपामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी २५ डिसेंबर २०२४ या दिवशी देशभरात त्यांना अभिवादन केले जात असताना, शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांनी वाजपेयी यांची तुलना नेहरू यांच्याशी केली.

राऊत यांची मुक्ताफळे

राऊत बुधवारी सकाळी पत्रकार परिषदेत म्हणाले, “अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) हे दुसरे नेहरू होते आणि अटलजी हे नेहरूंचे भक्त होते. सध्याचे भाजपाचे नेतृत्व हे रोज नेहरूंवर चिखलफेक करत असलं तरी अटलजींची राजकारणातील ओळख ही बिगरकॉंग्रेस, विरोधी पक्षातील दुसरे नेहरू अशी होती. तसेच नेहरूंनी त्यांना सतत आशीर्वाद आणि मार्गदर्शन दिले,” अशी मुक्ताफळे राऊत यांनी उधळली.

(हेही वाचा – Pandit Madan Mohan Malviya यांच्या जयंतीनिमित्त हिंदू महासभेकडून अभिवादन)

राऊतांना इतिहास मोडण्याची सवय

यावर भाजपा नेत्यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना संताप व्यक्त करत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

महाराष्ट प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, राऊत यांना सोयीनुसार इतिहास मोडून तोडून सांगण्याची सवय झाली आहे. “अटलजी हे उदारमतवादी होते. राऊत यांनी सोयीनुसार इतिहास मोडून तोडून सांगण्याची गरज नाही. अटलजींनी नेहरूंवर लोकसभेत आणि लोकसभेबाहेरही टीका केली होती.” उपाध्ये पुढे म्हणाले, “अटलजींची तुलना त्यांनी (राऊत) कुणाशी करू नये. अटलजी हे अटलजी होते. राऊत यांनी त्यांची तुलना इतर कोणाशी करण्याची नसती उठाठेव करू नये.”

नेहरू झुकले; अटलजींनी करून दाखवले

मुंबई भाजपा प्रवक्ते निरंजन शेट्टी यांनीही राऊत यांना सुनावले. “अटलजी (Atal Bihari Vajpayee) एक महान व्यक्तिमत्व होते त्यामुळे त्यांची तुलना कोणाशीही करणे योग्य नाही. नेहरूंनी अमेरिकेच्या दबावानंतर अणुबॉम्ब चाचणी केली नाही, ते अमेरिकेपुढे झुकले. मात्र अटलजी यांनी पंतप्रधान असताना अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता यशस्वी अणुबॉम्ब चाचणी करून दाखवली. त्यामुळे अटलजी ‘दुसऱ्या’ कोणासारखे नव्हते,” असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.