मराठा आरक्षण मजा घेण्याचा प्रश्न नाही; Devendra Fadnavis यांचा जरांगेंना टोला

90
मराठा आरक्षण मजा घेण्याचा प्रश्न नाही; Devendra Fadnavis यांचा जरांगेंना टोला
मराठा आरक्षण मजा घेण्याचा प्रश्न नाही; Devendra Fadnavis यांचा जरांगेंना टोला

आतापर्यंत त्यांनी दुसऱ्यावर ढकलले, पण आता ते आरक्षण देतात की नाही हे समजेल. आता खरी मजा आहे. हिशोब चुकता करण्याची, असे विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) उद्देशून केले होते. यावर मजा घेण्याचा प्रश्न नाहीत आहे. यावर मजा काय आली पाहिजे? असे उत्तर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दिले. आम्ही मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रश्नावर पहिल्या दिवसापासून गंभीर असल्याचेही त्यांनी सांगितले. ते नागपूरमध्ये (Nagpur) पत्रकार परिषदेत बोलत होते.

( हेही वाचा : बांगलादेशला बसणार भारतीय व्यापाऱ्यांच्या Boycott Bangladesh मोहिमेचा दणका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, पहिली गोष्ट मराठा आरक्षण हा मजा घेण्याचा प्रश्न नाहीच. यावर मजा काय आली पाहिजे? हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आम्ही या प्रश्नावर पहिल्या दिवसापासून मी असेन, अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील. आमच्या भूमिकेत कुठलेच अंतर नाहीये. आमच्यामध्ये कुठला अंतर्विरोध नाहीये. आम्ही जे निर्णय घेतले ते आमच्या तिघांचे आहेत. तसेच पुढेही घेतले जाणारे निर्णय तिघे मिळून घेऊी, असे ही फडणवीस (Devendra Fadnavis)म्हणाले.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.