- प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यानंतर महायुतीला मिळालेलं मोठं यश आणि त्यानंतर झालेला मंत्रिमंडळाचा विस्तार या सर्व गोष्टी व्यवस्थित पार पडल्यानंतर आता सर्वच बड्या राजकीय पक्षांमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याचे राजकीय जाणकारांकडून कळते.
प्रामुख्याने काँग्रेस पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष बदलण्यात येणार आहेत. तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती मंत्रिपदाची जबाबदारी आल्यामुळे लवकरच भाजपामध्ये देखील खांदेपालट होणार असल्याचे सूत्रांकडून कळते. याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील यांची टर्म संपून गेल्यामुळे त्यांच्या जागी देखील नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड होऊ शकते. (State President Post)
(हेही वाचा – TuljaBhavani Temple : … म्हणून 1 जानेवारीपर्यंत तुळजाभवानी मंदिर 22 तास राहणार दर्शनासाठी खुले)
भाजपात एक व्यक्ती एक पद
विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला घवघवीत यश प्राप्त झाले. त्यामुळेच बावनकुळे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. भाजपात एक व्यक्ती एक पद असे धोरण आहे. त्यामुळे बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्ष पद सोडावे लागणार आहे. येत्या १२ जानेवारी रोजी भारतीय जनता पक्षाचे अधिवेशन आहे. या अधिवेशनात नवीन प्रदेशाध्यक्षाची घोषणा होऊ शकते. माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वरती प्रदेश भाजपाची जबाबदारी येणार असल्याचे देखील कळते. (State President Post)
(हेही वाचा – बांगलादेशला बसणार भारतीय व्यापाऱ्यांच्या Boycott Bangladesh मोहिमेचा दणका)
काँग्रेस पक्षामध्ये देखील बदलाचे वारे
लोकसभा निवडणुकांमध्ये एक खासदारावरून तेरा खासदारांवर मजल मारणाऱ्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विधानसभेमध्ये मात्र अवघ्या २०८ मतांनी विजयी झाला. त्यांच्याच नेतृत्वात काँग्रेस पक्षाने मात्र १६ जागा निवडून आणू शकले. यामुळेच नाना पटोले यांनी पक्ष नेतृत्वाकडे आपला राजीनामा सुपूर्द केला असल्याचे कळते. त्यामुळे लवकरच काँग्रेस पक्षात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पद भरण्यात येणार आहे. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, सतेज बंटी पाटील तसेच माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. (State President Post)
(हेही वाचा – GST on Used Cars : वापरलेल्या कार, ईव्हींवरील १८ टक्के जीएसटीची भानगड काय आहे?)
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात देखील होऊ शकतात नेतृत्व बदल
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची या अगोदरच टर्म पूर्ण झाली आहे. त्यातच पक्षाचा विधानसभा निवडणूकीत दारूण पराभव झाल्यामुळं पक्षाला नवीन प्रदेशाध्यक्ष दिला जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड होईल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार हे तटकरे यांना प्रदेशाध्यक्षपदावर कायम ठेवतील असे राजकीय जाणकार सांगतात.
विधानसभा निवडणुका नंतर आता सर्व राजकीय पक्षांचे पुढील टार्गेट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुका असणार आहे. त्यामुळेच राज्यात सर्वच राजकीय पक्ष नेतृत्व बदल करतील. (State President Post)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community