ACB Raid in Vasai: पालघरमध्ये वनक्षेत्रपालाच्या घरी आढळले मोठे घबाड; नेमके प्रकरण काय?

256

लाचलुचपत विभागाने मंगळवारी एका वनपरीक्षेत्र अधिकाऱ्याला (Bribery of Forest Range Officer) 20 लाख रुपयांच्या लाचप्रकरणी रंगेहात पकडल्यानंतर त्याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली आहे. वसई तालुक्यातील ससूनवघर (Sasunavghar) गावातील सात गुंठे जमिनीच्या प्रकरणात २० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप चौरे (Forest Range Officer Sandeep Chaure) आणि अन्य दोघांविरोधात मांडवी पोलीस ठाण्यात (Mandvi Police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ACB Raid in Vasai)

लाचलुचपत विभागाने मंगळवारी रात्री सापळा रचून चंद्रकांत पाटील यांना 10 लाखांची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता संदीप चौरे यांचे नाव समोर आले. त्यामुळे त्यांचा या प्रकरणातील मुख्य सहभाग समोर आला. या प्रकरणी चौरे व पाटील यांच्यासह अन्य एका अनोळखी व्यक्तीविरोधात मांडवी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधित कायदा सन 2018 च्या कलम 7 व 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही.

(हेही वाचा – विधानसभेच्या पराभवावरून Congress मध्ये घमासान; प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग)

1 कोटी 31 लाखांची रोकड जप्त

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर लाचलुचपत विभागाने संदीप चौरे (Sandeep Chaure) यांच्या निवासस्थानी धाड टाकली. तिथे झाडाझडती घेताना अधिकाऱ्यांना 57 तोळे सोने व तब्बल 1 कोटी 31 लाख रुपयांची रोकड आढळली. त्यांनी ती रक्कम जप्त केली. या कारवाईमुळे वसई विरारमधील बहुतांश वनक्षेत्र हे चाळ माफियांच्या घशात कसे गेले? याचे संकेत मिळत आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे 4 वर्षांपूर्वी वसईच्या फॉरेस्टरेंज ऑफीस कार्यालयात अधिकारी दिलीप तोंडे (Deelip Tonde) यांनाही 10 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.